Govinda Wife Reaction : बॉलिवूड अभिनेता गोविंदा नेहमीच वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असतो. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यात सुरु असणाऱ्या वादामुळे ही जोडी अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपासून हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. मात्र, नक्की घटस्फोट घेणार का?, हा सवाल साऱ्या नेटकऱ्यांना सतावत होता. अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये नेमकं असं काय झालं ज्यामुळे घटस्फोटाचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अदयाप हे कारण अस्पष्ट असलं तरी मध्यंतरी सुनीता अहुजा यांनी माध्यमांशी बोलताना या चर्चांवर भाष्य करत काहीसा पूर्णविराम दिला. असं असलं तरी ‘गोविंदा कुठे आहे?’, या पापराजींच्या प्रश्नावर सुनीता यांनी दिलेली प्रतिक्रिया या चर्चां खऱ्या असल्याचं भासवत आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुनीता यांना अभिनेत्याबद्दल विचारले असता, तिने स्पष्टपणे उत्तर देण्यास नकार दिला. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा म्हणाली, ‘मॅडम, सर (गोविंदा) कसे आहेत?’ प्रश्न ऐकताच सुनीताने हाताने तोंड बंद करण्याचा इशारा केला आणि उत्तर देण्यास नकार दिला. यशवर्धननेही हसत पापराजींकडे पाहिलं. त्यानंतर सुनिता स्टेजवरुन खाली येताच पापाराजी तिला म्हणाले, ‘सर बेपत्ता’. यास तिने एका मजेदार पद्धतीने प्रतिसाद दिला आणि म्हटलं, ‘पत्ता द्या?’.
आणखी वाचा – अंतराळात जाणारे अंतराळवीर अंघोळ कशी करतात?, पाणी अंगावर घेताच हवेतच…; पाहा Inside Details
काही दिवसांपूर्वी सुनीताने गोविंदाच्या घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, “जोपर्यंत तुम्ही माझ्याकडून किंवा गोविंदाकडून आमच्या नात्याबाबत खरं काय हे ऐकत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नका. दरम्यान, अशा अफवा वाढविल्या गेल्या की लग्नाच्या ३७ वर्षानंतर दोघेही घटस्फोट घेणार आहेत. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, त्याचे राहणीमान या सगळ्यास कारणीभूत आहे. गोविंदाच्या वकिलाने यापूर्वी पुष्टी केली होती की, सुनिताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतु नंतर हे प्रकरण सोडविण्यात आले.
आणखी वाचा – वाढत्या उष्णतेमुळे हीट स्ट्रोक का येतो?, प्रमाण इतकं काय वाढलं?, तुमच्याबाबतीतही असंच होत असेल तर…
एकीकडे सुनीता यांनी घटस्फोटाबाबत केलेलं भाष्य आणि दुसरीकडे गोविंदा कुठे आहे?, या प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया यांत बराच फरक असल्याने दोघांमध्ये नेमकं काय सुरु आहे हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून कमेंट करत दोघांमध्ये नक्की काय सुरु आहे?, सत्य काय आहे?, अशा प्रश्नांचा भडीमार करताना दिसत आहेत.