‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘परदेस’, ‘सरफरोश यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून आणि बऱ्याच मराठी चित्रपट व मालिकांमधून बॉलिवूडसह मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणणे स्मिता जयकर. स्मिता जयकर सध्या सिनेसृष्टीपासून दुर आहेत. स्मिता जयकर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ चित्रपटामध्ये शेवटच्या दिसल्या होत्या. एकेकाळी बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेसह टेलिव्हिजनची स्क्रीन व नाटकाचा पडदा गाजवणाऱ्या स्मिता अलीकडे कलाक्षेत्रात फार सक्रिय नसलेल्या दिसून येतात.
स्मिता जयकर या सध्या मनोरंजन क्षेत्रात फारशा सक्रिय का नाहीत? याबद्दल त्यांनी स्वतः एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. स्मिता जयकर यांनी नुकतच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं आहे. तसेच इंडस्ट्रीने आपल्याला बाहेर फेकण्यापेक्षा आपणच इंडस्ट्रीतुन बाहेर पडलं पाहिजे असं एक वक्तव्य केलं.
आणखी वाचा – कन्या, तूळ व मकर राशीसाठी मंगळवारचा दिवस आर्थिक लाभाचा, तर काहींच्या अडचणी वाढणार, जाणून घ्या…
याविषयी स्मिता जयकर असं म्हणाल्या की, “प्रत्येक कलाकाराला आपण त्या क्षेत्रातून कधी निघायचं हे कळायला हवं. इंडस्ट्रीने आपल्याला बाहेर फेकण्यापेक्षा आपण त्यातून कसे बाहेर पडतो हे कळलं पाहिजे. एक काळ तुम्ही तरुण म्हणून पार पडल्यानंतर कालांतराने आपण म्हातारे होत जातो. आपलं वय वाढत जातं, हे प्रत्येक कलाकाराने स्वीकारलं पाहिजे. विशिष्ट वय झाल्यानंतर आपण आपल्याला त्या वयासह स्वीकारले पाहिजे”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची घोषणा, कोणत्या स्पर्धकांची शोमध्ये होणार एंट्री?, प्रोमोने वेधलं लक्ष
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “उगाच तरुण दिसण्यासाठी ओढाताण करणे या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. अर्थात कुणी काय करावं कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी मला माझ्या वयासह स्वीकारते. तुम्ही जर स्वीकारलं तर प्रत्येक वय सुंदर असतं. प्रत्येक वयाची एक सुंदरता असते.”