श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने हिट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री तिच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रद्धा कपूर राहुल मोदीला डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत होत्या. मात्र या अफवांवर त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर आता अभिनेत्रीने स्वतःच तिच्या व राहुलबरोबरच्या नात्यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Shraddha Kapoor On Relationship)
डेटिंगच्या अफवांच्या दरम्यान, श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘तू झुठी मैं मकर’ चित्रपटाचा लेखक राहुलबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रद्धा कॅमेऱ्यासमोर हसताना दिसत आहे. तर राहुलने विचित्र चेहरा केला आहे. हा फोटो शेअर करत श्रद्धाने लिहिले आहे की, “माझं हृदय ठेव पण माझी झोप परत दे मित्रा”. असं कॅप्शन देत तिने फोटो शेअर फनी इमोजीसह हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. आणि हा फोटो राहुलला टॅगही केला. या सेल्फीनंतर श्रद्धाने राहुल मोदीबरोबरचे नाते पक्के केल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा – आदित्यसाठी पारू करणार वडाची पूजा, दिशा-दामिनीसमोर येणार का सत्य?, मालिकेत रंजक ट्विस्ट

गेल्या वर्षी, श्रद्धा कपूर व राहुल मोदी अनेक प्रसंगी एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. या वर्षी मार्चमध्ये एका मित्राच्या लग्नातही ते एकत्र गेले होते. याशिवाय अभिनेत्रीने एकत्र घालवलेल्या सुट्ट्यांचे फोटो शेअर केले तेव्हा या अफवांना आणखी उधाण आले. या वर्षी मे महिन्यात श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने स्टारफिश व शंख शेल प्रिंटसह जांभळ्या रंगाचा नाईटसूट परिधान केलेला दिसला. परंतु या फोटोंमध्ये तिच्या पेंडंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आणि या पेंडंटवर ‘R’ हे अक्षर होते.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात जरी ‘तीन पत्ती’ या छोट्या भूमिकेतून केली असली तरी तिला २०११ मध्ये ‘लव्ह का द एंड’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. यानंतर श्रद्धाने ‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘बागी’, ‘हैदर’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘हसीना पारकर’, ‘स्त्री’ असे अनेक हिट चित्रपट दिले. लवकरच ती ‘स्त्री २’, ‘चालबाज इन लंदन’ आणि ‘चंदा मामा दूर के हैं’ या चित्रपटात दिसणार आहे.