Bollywood Actress On Married Life : सिनेसृष्टीत अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचे लग्नानंतर संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झाले आहे. बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्यांना लग्नानंतर अशा संकटांचा सामना करावा लागला आहे. बरेचदा या अभिनेत्री या समस्यांचा सामना करत, लढा देत पुन्हा नव्याने आपलं अस्तित्व निर्माण करु पाहतात. असाच त्रास एका अभिनेत्रीने तिच्या विवाहोत्तर आयुष्यात सहन केला. अभिनेत्रीने याबाबत कंगना रनौतच्या ‘लॉकअप या शोमध्ये खुलासा केला. ही अभिनेत्री म्हणजे मंदाना करिमी. अभिनेत्रीने तिच्या विवाहोत्तर आयुष्याबाबत आणि तिच्या पतीच्या वागणुकीबाबत खुलासा केला. सध्या अभिनेत्रीचे नवऱ्याबाबतचे धक्कादायक भाष्य तुफान व्हायरल होत आहे.
मंदाना करिमी ही मुस्लिम असून तिने हिंदू धर्मीय गौरव गुप्ताशी लग्न केले. अभिनेत्री म्हणाली की, लग्नानंतर गौरवचे रंग बदलू लागले होते आणि तो त्याच्या पालकांसह मिळून माझा छळ करायचा. जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमी कंगना रनौतच्या शो लॉकअपला पोहोचली तेव्हा तिने तिच्या विवाहित आयुष्याबद्दल आणि पती गौरव गुप्ताबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. मंदानाने सांगितले होते की, तिने वयाच्या २७ व्या वर्षी लग्न केले होते. लग्नापूर्वी त्यांनी गौरव गुप्ता यांना अडीच वर्षे डेट केले. डेटिंग केल्यानंतर त्यांनी साखरपुडा केला आणि सात महिन्यांनंतर लग्न केले.
आणखी वाचा – पवनदीप राजनची अपघातानंतर वाईट अवस्था, आयसीयुमध्ये दाखल करताच…; डोक्यालाही गंभीर दुखापत
मंदानाने सांगितले होते की, त्याने आणि गौरव यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला होता. पण हे दोघेही आधीच स्वतंत्रपणे जगत होते. मंदाना पुढे म्हणाली की, लग्नानंतर तिच्या नवऱ्याचे त्याच्या मैत्रिणींसह संबंध होते. इतकेच नाही तर सासरच्यांकडून देखील तिला खूप त्रास दिला जायचा. मंदाना म्हणाली, लग्नापूर्वी ते मला खूप सपोर्ट करायचे परंतु लग्नानंतर सर्व काही पूर्णपणे बदलले होते. अभिनेत्री म्हणाली की, तिची सासू जबरदस्ती तिला मंदिरात पूजा करायला लावायची आणि सलवार-कमीझ घालण्यास सांगायची.
आणखी वाचा – अनेक फ्रॅक्चर, जखमा, सहा तास शस्त्रक्रिया अन्…; रुग्णालयात अशा अवस्थेत आहे पवनदीप, पुन्हा ऑपरेशन होणार कारण…
मंदानाने सांगितले की, सासरचे अभिनेत्रीला एकटीला बाहेरही जाऊ द्यायचे नाहीत. तसेच अभिनय सोडण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. लग्नानंतर अभिनेत्रीला धर्म परिवर्तनही करण्यास सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की तिचे २०१७ मध्ये झाले होते आणि सहा महिन्यांनंतरच ती तिच्या पतीपासून विभक्त झाली.