शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गरोदर बायकोची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह, दीपिका पदूकोणने दाखवला बेबीबम्प, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मे 20, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Deepika Padukone's baby bump is seen in a viral video on social media

Video : गरोदर बायकोची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह, दीपिका पदूकोणने दाखवला बेबीबम्प, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांमध्ये आहे. अभिनेत्री गर्भवती आहे. सप्टेंबर महिन्यात ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या आई होण्याच्या खास क्षणांचा आनंद उपभोगत आहे आणि यात तिला तिचा साथीदार म्हणजेच तिचा नवरा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह उत्तम साथ देत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका व रणवीर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांचा हात धरत चालताना दिसले. या खास प्रसंगी रणवीर पत्नी दीपिकाची पूर्ण काळजी घेताना दिसला.

चाहत्यांच्या गर्दीतून जाताना रणवीर आपल्या पत्नीला अगदी सांभाळून घेऊन जाताना दिसला. तिला कुणाचाही धक्का लागू नये याचीही तो संपूर्ण काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच रणवीर-दीपिका यांचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दीपिकाचं बेबी बम्प दिसत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्रीने तिचा बेबी बम्प दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅंट घातली असल्याचे पाहायला मिळत आहे, तर रणवीर तिला गर्दीतून सावरत घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Video : साताऱ्यात ‘पारू’चं शूट करत असताना बायकोच्या आठवणीत प्रसाद जवादे व्याकुळ, अमृता म्हणाली, “तू माझा…”

या व्हिडीओखाली रणवीर-दीपिका यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या  व्हिडीओखाली “दोघांमध्ये किती प्रेम पाहायला मिळत आहे”, “यांना निरोगी बाळ व्हावे याच सदिच्छा”, “म्हणून रणवीरला काळजी घेणारा नवरा म्हणतात” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिका व रणवीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लवकरच दोघे आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती.

आणखी वाचा – मुलगा झाला हो! यामी गौतम झाली आई, नावही केलं जाहीर, म्हणाली, “आमच्या मुलाच्या”

दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दीपिका सप्टेंबर २०२४ मध्ये बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं होतं. रणवीर-दीपिका यांची हटके लव्हस्टोरी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून सुरु झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ व ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर-दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.



Tags: Bollywood entertainment newsdeepika padukoneDeepika Padukone Babybump News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Mugdha Karnik Angry On Voting System

"सहा तास प्रवास करुनही…", मतदान यादीत नावच नसल्यामुळे 'पारू'मधील अहिल्यादेवी नाराज, म्हणाल्या, "गेल्या २० वर्षांपासून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.