शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! विक्रांत मेस्सीचा इंडस्ट्रीला कायमचा निरोप, अभिनय सोडणार, म्हणाला, “गेले काही दिवस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 2, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Vikrant Massey decided to retire at the age of 37 and shared a social media post about it.

अभिनेता विक्रांत मेस्सीने घेतला निवृत्तीचा निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने त्याच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अलीकडेच विक्रांत ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात दिसला होता.  याआधी ‘१२ वी फेल’ आणि ‘सेक्टर ३६’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक झाले होते. या यशाचा फायदा घेऊन विक्रांत पुढे जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र या अभिनेत्याने अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी तो अभिनयाला अलविदा करणार असल्याचं समोर आलं आहे. (vikrant massey retirement)

विक्रांतने सोमवारी (२ डिसेंबर) सकाळी २०२५ नंतर अभिनयातून निवृत्त होणार असल्याची घोषणा करुन त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नोटमध्ये त्याने लिहिले की, “गेली काही वर्षे आणि त्याआधीचा काळ आश्चर्यकारक होता. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, परंतु जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवले की एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणूनही आता स्वतःला साजेशी आणि घरी परतण्याची वेळ आली आहे”.

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

रिपोर्ट्सनुसार, विक्रांत सध्या ‘यार जिगरी’ आणि ‘आँखों की गुस्ताखियां’ या दोन चित्रपटांवर काम करत आहे. या चित्रपटांबद्दल बोलताना अभिनेत्याने लिहिले, “मी २०२५ मध्ये शेवटची भेट घेणार आहे. मागील दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद”. विक्रांतच्या या घोषणेने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी टिप्पण्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले. एका चाहत्याने लिहिले, “तू असे का करत आहेस? तुझ्यासारखे फार कमी कलाकार आहेत. आम्हाला चांगल्या सिनेमाची गरज आहे”. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “अचानक? सर्व काही ठीक आहे का?”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, घरात आढळला मृतदेह

विक्रांतच्या चाहत्यांसाठी ही खूप धक्कादायक बातमी आहे. अनेक चाहत्यांनी विक्रांतला या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंतीही केली. “भाऊ, तू शिखरावर आहेस. तू असा विचार का करतोस?”, असे त्याच्या एका चाहत्याने विचारले आहे. काही चाहत्यांना असा प्रश्न पडू लागला की हा कुठल्या चित्रपटाचा किंवा ब्रँडच्या प्रचाराचा हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना?.

आणखी वाचा – 02 December Horoscope : मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस खास, जाणून घ्या…

दरम्यान, विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २८ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

Tags: vikrant masseyvikrant massey actorvikrant massey retirement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : दिशाची बहीण अनुष्का अपमानाचा बदला घेणार, किर्लोस्कर कुटुंबाला धोका, पारू या सगळ्यातून सोडवू शकेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.