Paresh Rawal Knee injury : राजकुमार संतोशी यांच्या ‘घातक’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. आणि यावर त्यांनी केलेला उपाय ऐकून साऱ्यांच्या नजरा त्यांच्या वक्तव्याकडे वळल्या आहेत. परेश रावल यांनी या दुखापतीवर उपचार म्हणून मूत्र प्यायले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, राकेश पांडे यांच्याबरोबर शूटिंगच्या वेळी त्यांना पायाच्या दुखापतीचा सामना करावा लागला, त्यानंतर टिनू आनंद आणि डॅनी डेन्जोंगपाने त्यांना तातडीने मुंबईच्या नानावटी रुग्णालयात नेले. परेश रावल म्हणाले की, ‘या दुखापतीनंतर ते खूप घाबरले आणि त्यांना त्यांची कारकीर्द संपली असेही वाटले’.
या दुखापतीनंतर त्यांना वीरू देवगन यांनी काय सल्ला दिला हेदेखील सांगितले. परेश रावल म्हणाले, “सकाळी उठल्यानंतर त्यांनी मला प्रथम स्वतःचे मूत्र पिण्यास सांगितले. सर्व सैनिक हे करतात. आपल्याला कधीही कोणतीही समस्या होणार नाही, फक्त सकाळी उठून प्रथम आपले मूत्र प्या. त्यांनी मला अल्कोहोल, मटण किंवा तंबाखू खाण्यास सांगितले, जे मी थांबवले होते. आणि त्याचबरोबर त्यांनी मला सकाळी नियमित अन्न आणि मूत्र पिण्यास सांगितले”.
आणखी वाचा – ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचं पोस्टर समोर, कथेत अनोखा ट्विस्ट, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग
परेश रावल म्हणाले, मला माझी लघवी प्यायची आहे असा विचारही मी करू शकत नव्हतो. अभिनेते पुढे म्हणाले, “मी ती लघवी बिअरसारखी पित असे, कारण जर मला लघवी प्यायचीच आहे तर मी ती योग्य पद्धतीने पिणार. मी हे १५ दिवस केले आणि एक्स-रे अहवाल आला तेव्हा डॉक्टरांना आश्चर्य वाटले. डॉक्टरांनी एक्स-रे वर एक पांढरा अस्तर पाहिला, ज्याने ते पूर्णतः बरे झाले आहेत असे दिसत होते”. ते म्हणाले की, ‘दुखापतीस साधारणत: २ ते २.५ महिने लागतात, परंतु ते दीड महिन्यांत बरे झाले’.
आणखी वाचा – प्रेम, वेदना आणि…; ‘माझी प्रारतना’चा जबरदस्त ट्रेलर समोर, उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेची कमाल
परेश रावल यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्रियदर्शनच्या हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमार आणि तबू यांच्यासह दिसणार आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्यासमवेत त्यांच्याकडे ‘हेरा फेरी 3’ हा चित्रपटही आहे.