शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर सूरज चव्हाणचा सुरुय सुखी संसार, बायकोने प्रपोज करताच लाजला आणि…; व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 20, 2025 | 3:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
suraj chavan wedding

लग्नानंतर सूरज चव्हाणचा सुरुय सुखी संसार, बायकोने प्रपोज करताच लाजला आणि…; व्हिडीओ समोर

suraj chavan wedding : मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळींनी लग्नगाठ बांधली. यांतील ‘बिग बॉस’ विनर सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात सूरज चव्हाणचा लग्नसोहळा पार पडला. २९ नोव्हेंबरला सूरज संजनासह लग्नबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. कुटुंबीय आणि गावकऱ्यांसह चाहत्यांनी लग्नाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सूरज चव्हाणच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

सूरजने त्याच्या मामाच्या मुलीसह म्हणजे संजनासह लग्नगाठ बांधली. सूरजचं संजनावर प्रेम होतं. आणि जिच्यावर प्रेम आहे तिच्याशीच लग्न करायचं असा अट्टाहास ठेवून त्याने अगदी धुमधडाक्यात लग्न केलं. ‘बिग बॉस’ मराठीचे विजेतेपद जिंकल्यानंतर सूरजच्या आयुष्यात खूप बदल झाले. लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपल्यामुळे सूरजच्या घरची परिस्थिती बेताची होती. अशावेळी त्याच्या बहिणींनी त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचं मोठं केलं.

आणखी वाचा – “अभिनयापेक्षा डायपर बदलण्यात मी जास्त एक्स्पर्ट झालो”, वडील झाल्यानंतर विकी कौशल म्हणाला, “खूप अवघड…”

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

आता तर सूरजचं स्वतःच हक्काचं घरही झालं आहे. सूरजने त्याच्याच गावात आलिशान बंगला बांधला आहे. आणि त्याच्या या नव्या घरातच त्याचं लग्न झालं. संजनाने या नव्या घरात गृहप्रवेश केला. लग्नानंतर आता सूरज व संजनाचा सुखी संसार सुरु असल्याचं समोर आलं आहे. सूरजने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये संजना किचनमध्ये जेवण करताना दिसली. मात्र आता सूरजने शेअर केलेल्या पोस्टमध्ये याची प्रचिती आली आहे.

आणखी वाचा – खूप वाईट पण मोठी लोकं आहेत, नावं सांगितली तर…; साऊथ सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीला केलं टॉर्चर, म्हणाली, “सेटवर एकटीच स्त्री…”

सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये थेट संजनाने सूरजला प्रपोज केल्याचं दिसत आहे. यावेळी असं दिसत आहे की, संजना पुष्पगुच्छ देत सूरजला “आय लव्ह यु”, म्हणते. यावर सूरज लाजतो आणि म्हणतो, “आज मी इतका खुश आहे की यापूर्वी कधीही नव्हतो”. यावरुन दोघांतील खास बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. सूरजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. आणि दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags: marathi weddingSuraj Chavansuraj chavan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
srinivasan death reason

साऊथ अभिनेत्याचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन, रजनीकांत यांनी गमावला जवळचा मित्र, सिनेसृष्टीवर शोककळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.