‘स्पिट्सविला’, ‘बिग बॉस मराठी’ अशा काही रिअॅलिटी शोमधून आणि मराठी मालिका व मराठी चित्रपट अशा माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे जय दुधाणे. ‘स्पिट्सविला’ च्या १३ व्या पर्वाचा जय विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी ३’ चा तो उपविजेता होता. आपल्या अभिनय व फिटनेसमुळे चर्चेत असलेला हा अभिनेता नुकताच एका नवीन कारणाने चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे जयने घेतलेली नवी कार. जयने नुकतीच एक अलिशान कार खरेदी केली असून याचे काही खास क्षण त्याने शेअर केले आहेत. (Jay Dudhane New Car)
जयच्या घरी नुकतंच नव्याकोऱ्या गाडीचं आगमन झालं आहे. नवीन गाडी घेतल्याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी जयचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. जून महिन्यात जयच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे ही नवीन गाडी खरेदी करताना वडिलांची आठवण म्हणून अभिनेत्याने त्याच्या बाबांचा फोटो आणला होता. जयच्या बहिणीने निधन झालेल्या वडिलांचा फोटो आपल्या हातात घेतल्याचे या फोटोमधून पाहायला मिळत आहे.
नवीन गाडी घेताना जयचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते आणि यावेळी त्याच्या आईने गाडीची पूजादेखील केली. गाडीची पूजा करतानाचे क्षणदेखील जयने त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. नवीन गाडी घेताना जय, त्याची आई व बहीण असे सगळेजण उपस्थित असल्याचे या व्हिडीमध्ये दिसत आहे. तसंच जयच्या या नवीन कारनिमित्त त्याच्यावर कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा चौथा कॅप्टन बनला गोलीगत सूरज चव्हाण, सलग तीन आठवडे नॉमिनेटेड असूनही मिळवले कॅप्टन पद
दरम्यान, जयच्या वैयक्तिक आयुष्यात काही महिन्यांपूर्वी मोठा आघात झाला होता. जयच्या वडिलांचे निधन कार्डियाक अटॅकमुळे निधन झाले होते. यामुळे जय आणि त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तसंच काही दिवसांनी त्याने येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून निरोप घेतला. स्वत:च्या वैयक्तिक कारणामुळे त्याने या मालिकेतून निरोप घेतला.