Akshay Kelkar Wedding : ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता अक्षय केळकर ९ मे रोजी लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्याच्या बरेच दिवसापासून लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली होती. तेव्हापासून हा अभिनेता केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, अखेर अक्षय बोहल्यावर चढला आहे. अक्षयने त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकर हिच्याशी लग्न केले. अभिनेत्याच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिच्या इन्साग्राम स्टोरीवर अक्षयच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. साधना आणि अक्षयच्या रिसेप्शन सोहळ्यातील हा फोटो आहे. अक्षय व साधना या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
अक्षय व साधना यांच्या लग्नातील रिसेप्शन लूक समोर आला आहे. यांत अक्षय काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे तर साधनाने लाल रंगाची सुंदर अशी सहावारी साडी नेसली आहे. दोघांचा हा लग्नसोहळ्यातील खास लूक लक्ष वेधून घेत आहे. अक्षयच्या पत्नीच्या गळयातील लांबसडक मंगळसूत्रानेही लक्ष वेधलं आहे. अमृता धोंगडेने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने या नवीन जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याच्या हळद समारंभाप्रमाणेच लग्नासाठीही अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते. प्रथमेश परबनेही अभिनेत्याच्या लग्नातील फोटो शेअर करत नवोदित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत अक्षयने लग्न करणार असल्याचं म्हटलं. “मे २०२५ . आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी. तरीही मुलींनो, आय लव्ह यु. मी फक्त तुमचाच आहे”, असं कॅप्शन देत त्याने चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अक्षयने अनेकदा त्याच्या आयुष्यातील रमाबद्दल सांगितलं होतं. अनेकदा त्याने मुलाखतींमधून त्याच्या आयुष्यातील रमा विषयी भाष्य केलं होतं. मात्र ही रमा नक्की कोण याबद्दल त्याने कधी सांगितलं नव्हतं. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील रमाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं.
आणखी वाचा – “त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…
अक्षय व साधनाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. अक्षयने यापूर्वीही अनेकदा त्याच्या आयुष्यातील साधनाबद्दल सांगितलं होतं. मात्र ही साधना नक्की कोण याबद्दल त्याने कधी सांगितलं नव्हतं. २३ डिसेंबरला त्यांच्या नात्याला १० वर्ष पूर्ण होताच त्याने त्याच्या आयुष्यातील साधनाचा चेहरा चाहत्यांसमोर आणला.