शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “भाईमुळे डोकं चक्रावलं”, उत्कर्ष शिंदेचा संग्रामला टोला, मतावर ठाम नसल्यामुळे म्हणाला, “मेडिकल रुमचं दार…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 21, 2024 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde comments on Sangram Chaugule controversy with Paddy Kamble and Abhijeet Sawant

Bigg Boss Marathi 5 मधील पॅडी व अभिजीतबरोबर घातलेलता वादावर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे भाष्य, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने ‘बिग बॉस मराठी’च्या वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा तसा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. (Bigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde)

अशातच नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये संग्राम अरबाजविरुद्ध खेळी करेल आणि टास्क जिंकेल अशी अपेक्षा होती. पण संग्रामने अरबाजबरोबर अगोदरच केलेल्या डीलमुळे त्याने आपला गेम दाखवला नाही. त्यानंतरच्या फेरीत अरबाजबरोबर टास्क खेळताना त्याला दुखापत होते आणि याचा दोष जान्हवी व संग्राम ‘टीम बी’ला देतात. यामुळे पॅडी, अंकिता व अभिजीत यांचे जान्हवी-संग्रामशी जोरदार भांडण होते. यावेळी संग्राम सर्वांना त्याची बाजू समजावून सांगतो. मात्र तो त्याची बाजू समजावून सांगताना सर्वांचाच गोंधळ होतो. यावेळी संग्रामच्या डीलबद्दल अभिजीत, पॅडी त्याला विचारतात तेव्हा संग्राम असं म्हणतो की, “मी टीमचं न ऐकता माझ्या विचारांनी खेळलो” असं म्हटलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टनसीमुळे अरबाज सुरक्षित, आता नक्की घराबाहेर कोण जाणार?, वेगवेगळ्या नावांची चर्चा

त्यानंतर त्याने आपली बाजू मांडताना अरबाजसमोर टीम वीक होत असल्याचे सांगितले. तेव्हा पॅडी त्याला सांगतात की, “तू ज्या टीमला वीक म्हणत आहेस त्याच टीममध्ये तू पण आहेस म्हणजे तू पण वीक होता का?”. त्यानंतर पुन्हा संग्राम असं म्हणतो की, “आपण सगळेच स्ट्रॉंगच होतो”. त्यावर पुन्हा पॅडी त्याला असं विचारतात की, “ज्या टीममध्ये तू होतास ती टीमही वीक होती का?” यावर संग्राम त्यांना उत्तर देत असं म्हणतो की, “ती टीम कशी वीक असेल?” यावर अभिजीतही त्याला असं म्हणतो की “तुम्ही आत्ताच म्हणालात की ती टीम वीक होती”. यावर संग्राम “तुम्ही मला शब्दांत फिरवू नका” असं उत्तर देतो. यात संग्राम पुरता गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “फक्त बहुमतासाठी मला वापरलंत आणि…”, बी टीमवर वर्षा उसगांवकरांचा पलटवार, निक्की-अरबाज यांची बाजू घेत म्हणाल्या…

संग्रामच्या याच गोंधळावर अभिनेता, गायक, संगीतकार व बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने भाष्य केलं आहे. उत्कर्षने संग्राम, पॅडी, अभिजीत यांच्या संवादाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि यावर त्याने असं म्हटलं आहे की, “डोकं चक्रावून टाकलं भाईने…” तसंच “बिग बॉस मेडिकल रुमचं दार उघडा” असं म्हणत टोमणाही मारला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले टीम बीबरोबर राहून अरबाजला ताकदीमध्ये टक्कर देताना पाहण्याची इच्छा होती. पण, संग्राम दुसरा वैभव निघाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

Tags: abhijeet sawantpaddy kambleSangram Chauguleutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
mukesh khanna on bollywood actors

"मोठे कलाकारच माकड झालेत आणि…", मुकेश खन्ना यांचा बॉलिवूड कलाकारांवर मोठे आरोप, म्हणाले, "फक्त पैशांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.