‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाने अभिनेते, कलाकार, रील स्टार, कीर्तनकार, गायक यांना संधी देत खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात रील स्टार सूरज चव्हाण स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेल्या सूरज चव्हाणने टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवरील रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. ‘गुलिकत धोका’ असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये स्पर्धक म्हणून आल्यानंतर सूरजला त्याचे चाहते सपोर्ट करताना दिसत आहेत. तर यंदाच्या पहिल्या आठवड्यात सूरज हा नॉमिनेट झाला असल्याचं समोर आलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सूरजला नॉमिनेट हा शब्द उच्चरायला जड जात असतं. तो हा शब्द नॉमिटेट असं उच्चारतो. यावर धनंजय पोवार पुढे येत त्याला या शब्दाची फोड करत त्याला उच्चारायला सांगतो. “जसं आपण टॉमी बोलतो ना तसं नॉमी”, असं तो सूरजला सांगतो. तर पॅडीही सूरजला हा शब्द उच्चारायला मदत करतो. इंटरनेटमधील नेट असं म्हणत तो शब्द सांगतो. सूरजलाही नॉमिनेट हा शब्द कसा उच्चारायचा असा प्रश्न पडला आहे. तर घनःश्याम, पॅडी व धनंजय त्याला मदत करत असतात.
सूरजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शिविली आहे. सदर व्हिडीओवर केवळ प्रेक्षकांनीच नाही तर मराठमोळ्या अभिनेत्यानेही कमेंट करत सूरजचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेता पुष्कर जोगने कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर पुष्करने कमेंट करत, “सूरज साधा आहे. देव त्याच भलं करो”, असं त्याने म्हटलं आहे. तर याशिवाय अनेकांनी कमेंट करत सूरजला पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.
“घरचे सदस्य हसण्याऐवजी त्याची मदत करत आहेत. हिच मराठी लोकांची ओळख आहे”, “मराठी शोमध्ये इंग्रजी शब्द बोलता आलाच पाहिजे असं कशाला पाहिजे. नामांकन म्हणून द्या त्याला किंवा नेमणूक असा शब्द द्या”, “ही हसण्याची गोष्ट नाही आहे. आपल्या मधील तर बहुतेक जणांना अजून सुद्धा सबस्क्राईब शब्द बोलायला येत नाही”, “शिकशील प्रयत्न करत राहा”, “सूरज हा खूप साधा आहे त्याला काही शिकवा धनंजय दादा”, “मराठी बिग बॉस करताय तर मराठी शब्द वापरा”, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर सूरजच्या समर्थनार्थ आल्या आहेत.