Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु होताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Bigg Boss Marathi 5 new promo)
या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांवरुन वर्षा उसगांवकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र आता नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात वर्षा या घराबहेर जाणार नसल्याचे दिसत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – The Family Man 3 मध्ये ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, खास लूकने वेधलं लक्ष, नेमकी भूमिका काय?
या नवीन प्रोमोमध्ये नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना बिग बॉस बोलवतात आणि त्यांच्यापुढे ठेवलेल्या सुटकेसमध्ये त्यांच्या निकालाचे लिहलेले एक कार्ड ठेवलेल असते. यात सूरज, जान्हवी व वर्षा यांच्या सुटकेस मध्ये ‘सेफ’ (सुरक्षित) असलेले कार्ड असतं. त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईमध्ये झाला होता मोठा अपघात, आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अशी झाली आहे अवस्था
या प्रोमोमधून बिग बॉस असं म्हणतात की, “प्रेक्षकांच्या मतांनुसार निक्की व अरबाज तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात”. यापुढे बिग बॉस “या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे…” अस म्हणतात आणि निक्की अरबाजला मिठी मारुन रडू लागते. त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.