शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुमच्यामध्ये ऐकून घेण्याची क्षमता नाही”, डीपीने वर्षा उसगांवकरांना सुनावलं, जोरदार भांडण, म्हणाला, “मी सर्वांच्या तोंडावर…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 19, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 New Promo Dhananjay Powar aka DP and Varsha Usgaonkar fight know the reason

Bigg Boss Marathi 5 च्या घरात डीपी व वर्षा यांच्यात होणार भांडण, नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खेळ आता रंगत चालला आहे असं दिसून येत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधील सर्व सदस्य टास्कमध्ये आपलं शंभर टक्के योगदान देताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’ सुरु होऊन आता ५० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. अशातचं नुकताच घरामध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी टास्क सुरु झाला आहे. टास्कमध्ये कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन नको असलेल्या सदस्याला बाद करायचं होतं. पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून निक्की-अरबाज तर, ‘बी टीम’कडून जान्हवी-संग्राम खेळण्यासाठी जातात. या टास्कमध्ये अरबाज अगदी सहजपणे जान्हवी व संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता आणि पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात.  (Bigg Boss Marathi 5 New Promo)

या टास्कपूर्वी अरबाजने संग्रामबरोबर डील केली होती. यामुळे पहिल्या फेरीत ‘ए टीम’ला विजय मिळवणं अगदी सहज शक्य झालं. ठरल्याप्रमाणे निक्कीला, अंकिता व अभिजीतच्या घरट्यात अंडी टाकून त्यांना कॅप्टन्सी कार्यातून बाद करायचं होतं. पण, ऐनवेळी निक्कीने पलटी मारली. त्यांच्या या डीलबद्दल आता डीपी यांना माहित झाले असून याबद्दल ते वर्षा यांना सांगत आहेत, मात्र काही कारणामुळे वर्षा व डीपी यांच्यात बाचाबाची होणार आहे. त्यांच्या या बाचाबाचीचा नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजला घाबरतो संग्राम, अंकिता, पॅडी व अभिजीतने चांगलंच सुनावलं, म्हणाले, “त्याला नाही तर कोणाला भिडणार?”

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये डीपी व वर्षा यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये डीपी वर्षा यांना असं म्हणतात की, “पहिल्या फेरीत संग्राम, जान्हवी व अरबाज यांच्यात डील झाली होती की, हे मी तुम्हाला सांगितलं होतं”. यावर वर्षा “नाही” असं म्हणतात. त्यानंतर धनंजय मांडी ठोकत “मी सर्वांच्या तोंडावर बोलतो” असं बोलतात. पुढे वर्षा त्यांना “ओरडू नका” असं म्हणतात. यावर धनंजय वर्षा यांना “तुम्ही ओरडायला भाग पाडता कारण तुमच्यात ऐकून घेण्याची क्षमता नाही” असं म्हणत उत्तर देतो.

आणखी वाचा – अंकुश चौधरीचा उभारण्यात आला मेणाचा स्टॅच्यू, आनंदाने भारावून गेली बायको, फोटो पोस्ट करत म्हणाली, “अभिमानाचा क्षण…”

मग पुढे वर्षा डीपी यांना “तू तोंडावर पडला आहेस” असं म्हणतात. यावर धनंजय “मी तोंडावर पडत नाही. मी शड्डू ठोकून उभा राहतो” असं उत्तर देतात. डीपी व वर्षा यांचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी डीपीलाअ पाठींबा दिला आहे. दरम्यान गेले काही दिवस वर्षा व डीपी यांच्यात काही कारणावरुन छोटे मोठे वाद होतानाचे पाहायला मिळाले होते. अशातच आता त्यांच्यात मोठे भांडण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.   

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
deepika padukone new house for mothe in law

मुलगी झाल्यानंतर दीपिका पदुकोणचा मोठा निर्णय, सासूबाईंसाठी खरेदी केलं आलिशान घर, आहे आदर्श सून

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.