Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धकांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. भाऊचा धक्का झाल्यापासून स्पर्धक मंडळींचं वागणं बोलणं बदललेलं पाहायला मिळत आहे. अनेकांचे खरे चेहरे समोर आल्यानंतर स्पर्धकांमध्ये एकमेकांबद्दलचा राग, द्वेष पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखने त्याच्या चक्रव्ह्यूहमध्ये घरामधील सदस्य त्याच्या मागे नेमकं काय बोलतात याचा खुलासा केला. त्यामुळे निक्की व आर्या यांच्यासमोर घरातील सर्व सदस्यांचे बोलणं आलं. आपल्या टीमवर भरपूर विश्वास असलेल्या निक्कीला सर्वात मोठा धक्काच बसला. टीम ए मधील स्पर्धक निक्कीच्या मागे तिच्याबद्दल काय बोलले हे कळतात निक्कीचा राग अनावर झाला आणि तिने टीम ए मधून एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळत होते. अगदी ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या दिवसापासून निक्की व अरबाजमध्ये हे बंध फुलताना दिसत होते. अरबाजचा खरा चेहरा समोर येताच निक्कीने त्याच्याबरोबरची सर्व नाती तोडून टाकली आणि तिने टीममधून एक्झिट घेतली. तेव्हापासून अरबाज निक्कीला धडा शिकवायच्या हेतूने घरात वावरताना दिसत आहे. टास्कदरम्यान घरात जोड्या बनवण्यात आल्या आहेत. यामध्ये निक्की व अभिजीत आणि अरबाज व आर्या यांची जोडी पाहायला मिळत आहे. निक्की व अभिजीत यांची जोडी एकत्र पाहून अरबाजचा ताबा सुटताना नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाला. या नवीन प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला “तू हसत आहेस?” असं म्हणत किचनमधील डिश जोराने आपटतो. यानंतर निक्की “काय बालिशपणा आहे?” असं म्हणते.
यावर अरबाज “तू मला hurt करत आहेस” असं म्हणतो. यावर निक्कीही “तुला माझी गरज नाहीये” असं म्हणते. तिच्या या बोलण्यावर अरबाजही “तुझं हे वागणं बघून तर नाहीये” असं म्हणतो. यानंतर निक्की त्याला “गरज नाहीये हे स्पष्ट बोलायचं” असं म्हणत निघून जाते. मात्र अरबाजला राग अनावर न झाल्याने तो रागाच्या भरात खुर्ची उचलून आपटतो. त्याचा हा रुद्रावतार बघून घरातील सर्वचजण गोंधळून जातात. हा प्रोमो पाहून आता नेटकरीही अरबाजवर भडकले असल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातील गोष्टी तोडून नुकसान केलं असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – ‘बाप्पा आमचा आला’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘आठवी अ’चे कलाकार कल्ला करणार

अभिनेता पुष्कर जोगने या प्रोमोखाली कमेंट करत, “या आक्रमकतेला परवानगी आहे का? घरातील लोकांसाठी हे खूप धोकादायक आहे. ‘बिग बॉस’ची कारवाई करा. ही अनियंत्रित आक्रमकता आहे”, असं म्हणत राग व्यक्त केला आहे. तर “कृपया याला घरातून बाहेर काढा. हा ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीच नुकसान करत आहे”, “याला जेलमध्ये टाका. बाहेर कोण तरी आहे. मग इथे काय नाटक करायचं. BB प्रॉपर्टीच नुकसान करत आहे. आता जेल हाच पर्याय आहे”, “अरबाज त्या वस्तू तुझ्या घरुन नाही आणल्या आहेस. ही ‘बिग बॉस’ची प्रॉपर्टी आहे”, “तुझ्या काय घरुन आणले आहे का ते सामान”, “अरबाजला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे”, “याला बाहेर काढा. याने नियमांचे उल्लंघन केले आहे”, असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे.