Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने ‘बिग बॉस मराठी’च्या वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा तसा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही.
संग्राम चौगुलेने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण दोनच आठवड्यात संग्रामचा खेळ संपला असून वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर पडावं लागलं आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान, संग्रामच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे आता संग्रामवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचंही बिग बॉसने म्हटलं आहे.
संग्रामच्या दुखापतीविषयी बिग बॉसने असं म्हटलं की, “तुमच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे तुमच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. पण दुखापत गंभीर होऊ नये यासाठी आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर आपल्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली असल्याचे म्हटलं. या उपचारासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे आणि हे बिग बॉसच्या घरात शक्य नाही. यामुळे तुम्हाला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावे लागत आहे”.
दरम्यान, संग्रामचा खेळ सुरुवातीपासून प्रत्येकाला वीक वाटत होता. त्यातच रितेश भाऊंनीही भाऊच्या धक्क्यावर त्याच्या खेळाविषयी त्याची कानउघडणी केली होती. त्यातच आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यामुळे घरात आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने दोनच आठवड्यात खेळ आटोपता घेतला.