Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील निक्की व आर्या यांच्यातील वाद हा जगजाहीरआहे. गेल्या आठडव्यात निक्कीकडून आर्याला कानाखाली मारली गेल्याची घटना घडली आणि याची शिक्षा म्हणून निक्कीला ‘बिग बॉस’च्या घराला रामराम करावा लागला. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर ‘बिग बॉस’ने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं गेलं. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्याला घडलेल्या घटनेचा जाब विचारला आणि त्यानंतर ‘बिग बॉस’ने अंतिम निर्णय देत तिला घरातून निष्कासित केलं गेलं. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आर्याने नियमभंग केला असला, तरी अनेक नेटकरी आर्याच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे. (Aarya Jadhao Rap Song)
आर्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांसह नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाहेरील प्रेक्षकांकडून तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे घराबाहेर आलेली आर्या या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशातच आर्याने नुकतीच इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे या सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेत आर्याने घरातील निक्कीलाअ मारल्याच्या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने निक्कीला कानाखाली मारल्याचा घटनाक्रम सांगत संपूर्ण प्रकरणावर रॅप करत आपलं रोखठोक मत मांडलं आहे.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी
कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया सरे आम
बात बाप तक चली गयी, हम सहेते रहें हाय राम
धक्के की चादर तलें छुपाई तुने वो हिंसा थी
जब देती रही तू घाँव मुझे, तब कहा गयी तेरी चिंता थी
फिर मैंने भी एक गलती की, तुझे तेरी तरह जबाब दिया
मेरे कर्माने मी मुझसे मेरे दो पल की गलती का हिसाब लिया
पर तेरा भी तो कर्मा हैं, ये तुझको भी तो मिलना हैं
और देख रही इन जनता इसको हलके मैं तू ले गयी
तू घर तोडते रहे गयी और मैं दिल जीत के ले गयी!
दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना ‘बिग बॉस’ने “कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि त्यानंतर आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य ‘बिग बॉस’च्या मुलभूत नियमांचं उल्लंघन आहे. ‘बिग बॉस’च्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही” असं म्हणत ‘बिग बॉस’ने आर्याला घराबाहेर काढलं आहे.