Akshay Kelkar Wedding : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अक्षय केळकरच्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय. दहा वर्ष अक्षयने ज्या मुलीवर प्रेम केलं त्या मुलीसह लग्न बंधनात अडकत त्याने त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अक्षयच्या या शाही विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असून त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. अक्षयने ९ मे रोजी साधना काकटकरसह विवाहसोहळा उरकला आहे. अगदी शाही थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. सध्या अक्षय व साधना त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक कलाकार मंडळींनीही उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळाली.
‘बिग बॉस’च्या घरात असताना अक्षयने त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या माणसाबद्दल अनेकदा भाष्य केलं. या व्यक्तीला त्याने रमा असं नाव दिलं. कारण अक्षयला रमा माधव ही जोडी फार आवडते. त्यामुळे तो त्याच्या प्रेयसीला प्रेमाने रमा अशी हाक देतो आणि कालांतराने त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या रमाचा चेहरा दाखवत त्याच्या आयुष्यातील ही रमा नेमकी कोण आहे याचा खुलासा देखील केला. रमाबाबत सोशल मीडियावर माहिती देत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आणि काही दिवसांनी रमा आणि अक्षय हे लग्न बंधनात अडकणार असल्याचेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.
आणखी वाचा – अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस
अक्षय केळकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण दहा वर्षांचे प्रेम सफल झाल्यानंतर अक्षयने प्रेयसी साधना काकटकरसह लग्न केले. ‘१० वर्षांचं स्वप्न’ असं कॅप्शन देत हार्ट इमोजीसह त्याने पुढे हसत हसत असे लिहिले की, ‘संपलं रे संपलं’. यावेळी विधीवेळी जरी अक्षय व साधना खुश असले तरी प्रत्यक्षात अक्षय मात्र भावुक झालेला दिसला. या लग्नातील समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय साधनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना अतिशय भावुक झाल्याचे दिसले.
आणखी वाचा – Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर
दहा वर्षांच्या त्यांच्या प्रेमाचे आता एका नव्या नात्यात रुपांतर होताना पाहून अक्षयच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. यावेळी अक्षय त्याचे अश्रू काही थांबवू शकला नाही तर अक्षयच्या डोळ्यातले अश्रू पाहताच साधनाचेही डोळे पाणावले. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असला तरी तितकेच दोघेही भावुक झालेलेही दिसले. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या डोळ्यातील पाणी हे आनंदाश्रू असल्याच्या कमेंटही अनेकांनी केल्यात.