काही माणसांना फक्त त्यांच्या कामासाठीच नाही तर त्यांच्या नानाविविध कृतींसाठी सुद्दा प्रेकशगक लक्षात ठेवतात. या अजब रसायन म्हणल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये एक नाव असं आहे जे त्याच्या प्रत्येक कृतीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. कधी लग्नाचा विषय, कधी बिग बॉसच्या घर मधला राडा राखी तिच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. फक्त मजा, मस्करीचं नाही तर आईच्या निधनानंतर राखीची भावुक बाजू सुद्दा प्रेक्षकांच्या समोर आली आहे.(Rakhi Sawant video viral)
पण काही ना काही कारणांमुळे चर्चेत असलेली राखी आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फॅन्स नेहमी आपल्या आवडत्या कलाकारा सोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात आणि कलाकार ही त्यांच्या आग्रहखातर नाही म्हणत नाहीत आणि फॅन्सची इच्छा पूर्ण करतात. पण राखी काही खोड काढणार नाही असं होईल का राखीचा आणखी एक असा व्हिडिओ व्हिरल होतोय सेल्फी काढणाऱ्या फॅन्सचे मोबाईल घेऊन राखी निघून जाताना या व्हिडिओ मध्ये दिसते. पण त्या नंतर राखीने स्वतः ते मोबाईल परत देऊन त्या चाहत्यांसोबत सेल्फी काढले. तर या व्हिडिओ वर चाहत्यांनी राखी तुला पुन्हा अशी मस्ती करताना छान वाटतंय अशा आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.

राखी ही तिच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांचे मनोरंजन करते.ती सिनेसृष्टीतील ड्रामा क्यूईन म्हणून ओळखली जाते. तिचा नुकताच ‘झुटा’ हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच तिने दुबईमध्ये अभिनयाची अकॅडमीची सुरुवात केली. काहीदिवसांपूर्वीच राखीला मातृशोक झाला. गंभीर आजाराने राखीच्या आईने जगाचा निरोप घेतला. बिग बॉस मराठी आणि बॉग बॉस हिंदी मध्ये राखीची जरा जास्तच चर्चा रंगते. प्रत्येक सिझनला राखीला बिग बॉस मध्ये बोलवले जाते. प्रेक्षकांना तिची मनोरंजन करण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रचंड आवड्ताना दिसते.(Rakhi Sawant video viral)
हे देखील वाचा – म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’