मराठी सिनेविश्वात बरेच असे कलाकार आहेत ज्यांच्यामुळे आजही मराठी सिनेसृष्टी ओळखली जाते. महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांसारख्या एव्हरग्रीन कलाकारांमध्ये एक नाव कोणताही मराठी माणूस विसरणार नाही ते नाव म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आज आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या आपल्यासोबत नसला तरी त्याची आठवण आल्यावाचून राहत नाही.(Bharat Jadhav Laxmikant Berde)
सर्वसामान्य माणसांसोबत कलाकार ही आजही लक्ष्याची आठवण वेळोवेळी काढतात. कारण उत्तम विनोदाचं टायमिंग, अभिनयशैली, माणुसकी या साऱ्या गोष्टी लक्ष्यात होत्याच मात्र सिनेसृष्टीत असताना त्याचा एक दरारा देखील होता, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. आणि याचा प्रत्यय शेअर केला आहे अभिनेते भारत जाधव यांनी.
पाहा भरत जाधव यांना काय म्हणाले होते लक्ष्मीकांत बेर्डे (Bharat Jadhav Laxmikant Berde)
अभिनेते भरत जाधव यांच्या लक्ष्या सोबतच्या बऱ्याच आठवणी आहेत. दोघेही विनोदाचे बादशाह म्हणून आजही थाटामाटात सिनेसृष्टीत वावरत आहेत. पछाडलेला हा लक्ष्या आणि भरत यांनी केलेला शेवटचा सिनेमा. बरं हा चित्रपट दोघांनी एकत्र केलेला शेवटचा सिनेमा आहेच मात्र लक्ष्याच्या आयुष्यातील ही हा शेवटचा सिनेमा ठरला. याची आठवण भरत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर देखील केली होती.(Bharat Jadhav Laxmikant Berde)
हे देखील वाचा – तुला शिकवीन चांगलाच धडा! मृणाल यांनी कविता मेढेकर यांना दिली सक्त ताकीद
भरत यांनी लक्ष्या सोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याखाली त्यांनी म्हटलंय, लक्ष्या मामा..! खुप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केल, आधार दिला. त्यांनी आपल स्टारपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणुन हाक मारू शकायचो. खुप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्या बद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट.
‘सही रे सही’ जोरात सुरू होत. अशातच जानेवारी २००३ ला महेश कोठारे सरांनी पछाडलेला साठी विचारलं. आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत सही चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते त्यामुळे मी त्यांना नकार कळवला. मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की,” तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे. महेशला पटकन जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो पिक्चर सोडू नकोस.” मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि तिथून लक्ष्या मामांना कळवल की मी पछाडलेला करतोय.(Bharat Jadhav Laxmikant Berde)
हे देखील वाचा – वडिलांच्या निधनानंतर आलेली ती वेळ निभावणं कठीण होत!तरीही भाऊ कदम थांबले नाहीत
सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस. कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. पछाडलेलाला मी त्यांचा आशीर्वाद मानतो. यावरून हेच कळलं की, लक्ष्या मामांच्या दरारापायी भरत जाधव यांना देखील त्यांचा शब्द मोडता आला नाही.
