भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे पात्र कोणतंही असो प्रेक्षकांकडून कौतुकाचा हक्क सगळ्यांना मिळाला आहे. खूप कमी मालिका अशा असतात ज्या कमी काळात प्रेक्षकांच्या जवळ पोहचतात भाग्य दिले तू मला हि मालिका याच यादीत येते. सध्या मालिकेत राज कावेरीच्या लग्नाचा ट्रक पार पडला. बऱ्याच अडचणींचा सामना केल्या नंतर अखेर राज कावेरीचं लग्न अगदी थाटात पार पडलं. (Raj Kaveri Breakup)
आता मात्र एक नवीन संकट राज कावेरी समोर आल्याचं दिसत आहे.मालिकेत एक महत्वाचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ याही या मालिकेचा महत्वाचा घटक आहेत. त्या साकारत असलेलं रत्नमाला हे पात्र देखील प्रेक्षकां चांगलंच आवडलं आहे. पण मालिकेत रत्नमाला यांची ढासळत चाललेली प्रकृती वरून आता रत्नमाला हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार का याची भीती प्रेक्षकांना आहे. रत्नमाला यांचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न राज आणि कावेरी कडून केला जातोय.
परंतु रत्नमाला याना त्वरित इलाजाची गरज आहे नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टर्स राज कावेरी ला सांगतात. अशातच राज कावेरीच्या आयुष्यात पुन्हा वैदेहीची एन्ट्री होते. वैदेही राज ला सांगते मी रत्नमाला यांना किडनी देण्यासाठी तयार आहे फक्त माझी एक अट आहे. मी किडनी दिल्या नंतर तुला कावेरीला सोडून माझ्याशी लग्न करावं लागेल. तर आईचा जीव वाचवण्यासाठी राज काय निर्णय घेणार? कावेरी आणि राज मध्ये पुन्हा दुरावा येणार का? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहे.

राज कावेरी या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. सोबतच रत्नमाला यांचं कॅरॅक्टर ही प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरताना दिसत आहे. अशात आता मालिकेत कोणतं नवीन वळण येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Raj Kaveri Breakup)