मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पत्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज आणि कावेरीची भूमिका पार पाडणारे अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले या नव्याकोऱ्या जोडीने प्रेक्षकाना वेड लावलं आहे. या नव्या जोडीच्या सोबतीला साथ लाभली ते अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची. ज्यांच्या अभिनयातील अनुभवाचा वापर पुरेपूर त्यांच्या अभिनयातून अनुभवता येतो. तर बऱ्याच संकटानंतर मालिकेमध्ये आता अखेर प्रेक्षकांच्या अगदी आवडीचा भाग शॉट करण्यात आला आहे तो म्हणजे लवकरच लाडक्या राजकावेरीचं लग्न होणार आहे.(bhagya dile tu mala)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मला आता अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. पुढे नक्की काय होणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमातील कलाकार आणि कथा यामुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेतील राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अनेक अडचणीनंतर अखेर राज कावेरी यांचं अखेर लग्न ठरलं आणि सध्या मालिकेत लग्नाची घाई पाहायला मिळतिये. या मालिकेतील राजची आई रत्नमाला या आजारी आहेत.
हे पात्र घेणार मालिकेतून निरोप?(bhagya dile tu mala)
मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार राज कावेरी यांची लग्न सराई सुरू आहे. पण त्यातचं रत्नमाला यांची तब्येत देखील खराब झाली आहे. तर त्यांना डॉक्टरांनी देखील तुमचे काही दिवसच बाकी आहे अस देखील सांगितलंय. तर आता रत्नमाला यांचा ट्रक संपणार का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.नुकतच राज कावेरीच्या लग्नाच आमंत्रण देण्यासाठी जान्हवी किल्लेकर म्हणजे मालिकेतील सानिया हीने सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ शेअर केलायं.(bhagya dile tu mala)
====
हे देखील वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा
====
या व्हिडिओत मोहिते कुटुंब दिसत असून ते या व्हिडीओत राज कावेरीच्या लग्नाचं आमंत्रण देत आहेत. पण मालिकेत रत्नमाला या आजारी असल्यामुळे त्याचा आता ट्रॅक संपणार का? अशी चिंता चाहत्यांना लागली आहे. तर अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर रत्नमाला तुम्ही आजारी नका पडू,do not end character of ratnamala, निवेदिता ताईना घालवू नका अश्या अनेक कॉमेंट केल्या आहेत.