Aishwarya Narkar On Trollers : सध्या देशभरात ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. लष्करानं आतापर्यंत पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, सवाई, बिलाल, कोटली, बरनाळा, सरजाल आणि महमूना ही ९ ठिकाणं नष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर एकीकडे सरकारची देशभरात मॉक ड्रिलची तयारीही सुरु आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र भारतीयांमध्ये पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असं असलं तरी एकीकडे या हल्ल्यांमुळे काळजीही व्यक्त केली जात आहे.
या सर्व वादग्रस्त चर्चांमध्ये एका मराठमोळ्या कलाकार जोडीला रील बनवणं महागात पडलं आहे. ही कलाकार जोडी म्हणजे नारकर कपल. नारकर कपल नेहमीच त्यांच्या रील व्हिडीओमुळे चर्चेत असलेलं पाहायला मिळतं. बरेचदा ही जोडी त्यांचे डान्स व्हिडीओमुळे ट्रोलही होताना दिसली आहे. अनेकदा या जोडीने ट्रोलिंगचा सामना केला आहे. दरम्यान काही वेळा ऐश्वर्या नारकर यांनी या ट्रोलिंगला उत्तर देत नेटकऱ्यांची बोलती बंद केलेली पाहायला मिळाली आहे. ऐश्वर्या या सडेतोड उत्तर देण्यात कधीच मागेपुढे पाहत नाहीत. यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि देशभरात सुरु असलेल्या घटनांवरुन त्यांच्या डान्स व्हिडीओ पाहता नेटकऱ्याने ट्रोल केले.
आणखी वाचा – गरिबांचा वाली नाहीच! एक हजार रुपयांसाठी रुग्णवाहिका नाकारली, कल्याणमध्ये महिलेचा मृत्यू अन्…; संतापजनक घटना
ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांनी चिकनी चमेली या गाण्याच्या टोनवर एक डान्स व्हिडीओ बनवला. आणि हा व्हिडीओ त्यांनी आज सकाळी बनवला असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं. सदर व्हिडीओवर एका नेटकऱ्याने नारकर कपलला देशात सुरु असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच भान ठेवण्यावरुन सुनावलं. देशभरात युद्धजन्य परिस्थिती असताना डान्स करत व्हिडीओ पोस्ट करणं कसं सुचतं असा सवाल करण्याचा कल त्या नेटकऱ्याचा असलेला दिसतोय. मात्र, याला ऐश्वर्या नारकर यांनीही चोख प्रतिउत्तर देत नेटकऱ्याचं तोंड बंद केलं. देशभरात सुरु असलेली परिस्थिती आणि भारताने पाकिस्तानवर केलेला यशस्वी हल्ला लक्षात घेता हा आनंद साजरा करण्यात काय चूक आहे अशा आशयाचे प्रतिउत्तर ऐश्वर्या यांनी दिले.
आणखी वाचा – अपघातानंतर पनवदीपवर सहा तास शस्त्रक्रिया, शुद्धीत आल्यानंतर पहिला फोटो समोर, आता परिस्थिती अशी की…

“देशात काय चालले आहे याचे तरी भान ठेवा रील टाकताना”, असं मनात नेटकऱ्याने या नारकर कपलला डिवचलं. यावर ऐश्वर्या यांनी रिप्लाय देत, “ऑपरेशन सिंदूरने तुम्हाला आनंद झाला नाही का?”, असा सवाल केला. आणि त्याखाली आणखी एक रिप्लाय देत “भारतीय ना?”, असा प्रश्नही केला. तर ऐश्वर्या व अविनाश यांचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस आला असून त्यांचं भरभरुन कौतुकही केलेलं या व्हिडीओखालील कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे.