१६ जानेवारी म्हणजेच काल भारतभरात ‘फादर्स डे’ मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कालच्या ‘फादर्स डे’निमित्त सर्वांनी आपल्या बाबांबरोबरचे काही खास क्षण शेअर करत ‘फादर्स डे’ साजरा केला. हिंदीसह अनेक मराठी कलाकारांनी आपल्या बाबांबद्दल आठवणी, किस्से व काही प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर केले होते. मात्र अभिनेते अविनाश नारकर यांनी कालच्या ‘फादर्स डे’निमित्त आपल्या मुलाबरोबरचे काही फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते.
अविनाश व ऐश्वर्या नारकर ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो. अशातच त्यांनी शेअर केलेला लेकचा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये नारकर पिता-पुत्राचा खास बॉण्ड दिसून येत आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ते दोघे विमानात बसलेले दिसून येत आहेत तर एका फोटोमध्ये अविनाश नारकरांना त्यांच्या लेकाने पाठीवर उचलून घेतलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अविनाश यांच्यासह त्यांच्या मुलांचे अनेक खास क्षणही पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – विरोचकाच्या हाती पुन्हा एकदा विचित्र वीणा, नवीन शक्ती मिळणार? काय असेल नेत्राचं पुढचं पाऊल?
अविनाश यांनी कालच्या ‘फादर्स डे’चे औचित्य साधत हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली त्यांनी “तुझ्या जगण्यातला प्रत्त्येक क्षण आनंद व समाधानाने ओतप्रोत भरलेला आणि भारलेला राहो. तुला आभाळभर प्रेम व खूप खूप आशीर्वाद. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे” असं म्हटलं आहे. अविनाश नारकर सहसा त्यांच्या लेकाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत नाहीत. अशातच त्यांनी काल शेअर केलेल्या या व्हिडीओमधून त्यांची वडील म्हणून एक हळवी बाजू त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आणि त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरालाही ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, हुकस्टेपने वेधलं लक्ष, भुवनेश्वरीही कमेंट करत म्हणाली…
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या मुलाचं नाव आहे अमेय नारकर आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या मुलाचं नाव आहे अमेय नारकर. आई-वडिलांप्रमाणेच तोही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. रुईया महाविद्यालयातून त्याने बीएमएममधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. तो रुईया नाट्यवलयमध्ये खूप सक्रिय होता. या माध्यमातून त्याने बऱ्याच एकांकिका व नाटकांमध्ये काम केलं आहे.