ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते राजकुमार कोहली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे काल सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अभिनेता अरमान कोहली यांचे वडील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले. समोर आलेल्या वृत्तानुसार, राजकुमार कोहली बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते, आणि ते बराच वेळ बाहेर आले नाहीत. तेव्हा त्यांच्या मुलाने बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा ते जमिनीवर कोसळलेले आढळले. (Rajkumar Kohli Passed Away)
त्याच क्षणी अरमान कोहली त्यांना घेऊन रुग्णालयात गेले. त्यानंतर रुग्णालयात ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांना मृत घोषित करण्यात आले. काल सायंकाळी राजकुमार कोहली यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी, अरमान कोहली अगदी कोलमडून गेलेले पाहायला मिळाले. वडिलांच्या जाण्याने त्यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
राजकुमार कोहलीचे अंतिम संस्कार काल मुंबईत झाले, यावेळी अरमानचे गायक, अभिनेता सोनू निगमने सांत्वन केले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला आहे. अरमान सोनू निगमच्या खांद्यावर डोके टेकवून रडताना दिसला. या हृदय हेलवणाऱ्या व्हिडीओने अनेकांचे डोळे पाणावले.
राजकुमार कोहली हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. २५हून अधिक चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांनी त्यांचा मुलगा अरमान कोहलीला इंडस्ट्रीत लाँच केले आहे. अरमान त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता आणि तो वडिलांबरोबरच राहत होता. शिवाय अरमान शेवटचा बिग बॉसमध्ये दिसला होता. तनिषा मुखर्जीबरोबर त्याच्या असलेल्या नात्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
आणखी वाचा – अबब! प्राजक्ता माळीने घातला तब्बल ‘इतक्या’ किलोंचा घागरा, म्हणाली, “नीट चालता…”
राजकुमार कोहली ‘जानी दुश्मन’, ‘नागिन’, ‘पत्नी और तवैफ’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते. राजकुमार कोहली यांचा जन्म १९३० साली झाला. १९६० साली राजकुमार यांनी सिनेसृष्टीत सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु केला. १९६३ साली त्यांनी ‘सपनी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. यानंतर त्यांच्या ‘लुटेरा’, ‘कहाणी हम सब की’ सारख्या चित्रपटांना बऱ्यापैकी सफलता मिळाली.