अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच बॉलीवूडमध्ये बऱ्याच काळापासून अभिनय करणाऱ्या एका अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील अशीच एक आनंदची बातमी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल ने वडील झाल्याची आनंदाची बातमी त्याच्या इंस्टाग्राम वरून शेअर केली आहे. अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला यांना पुत्र प्राप्ती झाली आहे.(arjun rampal)
वयाच्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत अर्जुन चौथ्यांदा बाबा झाला. अर्जुन आणि गैब्रिएला यांनी २०१९ ला सुद्धा एका मुलाला जन्म दिला होता. याशिवाय अर्जुनला २ मुली देखील आहेत. यासंदर्भात अभिनेता अर्जुन रामपाल ने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर खास पोस्ट केली आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय “मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका सुंदर मुलाचा आशीर्वाद मिळाला आहे. आई आणि मुलगा दोघेही चांगले आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांच्या टीमचे आभार. आमच्यासाठी आज एक आनंदाचा दिवस आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद.
अमिताभ ते शाहरुख सर्वांसोबत केलं आहे चित्रपटात काम (arjun rampal movies)
या आनंदाच्या बातमीसाठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील त्याचं आणि कुटुंबाचं अभिनंदन केलं आहे. अर्जुन मागील बऱ्याच वर्षांपासून मनोरंजन विश्वात अभिनय कुणी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मोक्ष, दिल है तुम्हारा, डॉन, कभी अलविदा ना केहना, अशा अनेक जुन्या चित्रपटात तर राजनीती, सत्याग्रह, डी डे या अलीकडच्या चित्रपटांमध्ये देखील त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चित्रपटांसोबतच अनेक वेब सिरीज मध्ये देखील अर्जुन ने आपला जॅम बसवला आहे.(arjun rampal kids)
