Sshura Khan Baby Bump : बॉलिवूड अभिनेता-चित्रपट निर्माता अरबाझ खान याने २४ डिसेंबर २०२३ रोजी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केले. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर शुराने अरबाजच्या आयुष्यात प्रवेश केला. शुरा आणि अरबाज बरेचदा त्यांच्या वैयत्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. दोघांची जोडी बरेचदा एकत्र स्पॉट होताना दिसते. आता वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाझ पुन्हा वडील होणार असल्याचे समोर आले आहे. शुरा गर्भवती असल्याची आजवर चर्चा होती. पण आता अभिनेत्रीच्या समोर आलेल्या एका व्हिडीओने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या व्हिडीओमध्ये शुराचा बेबीबंप दिसत आहे.
अरबाझ खानची पत्नी शुरा खान मुंबईतील एका चष्माच्या दुकानात दिसली. पापाराजी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करायला गेले तेव्हा ती त्या दुकानातून बाहेर पडली. तिने दुकानाच्या पायऱ्या काळजीपूर्वक उतरल्या आणि पापराझीलाही अभिवादन केले. लग्नानंतर ती पापाराझींना पाहून पळ काढायची आता ती त्यांच्यासमोर खूप आरामदायक असते आणि पोझ देखील देते. शुराच्या या व्हिडीओवर चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत.
एकाने लिहिले, ‘माशाल्लाह’. तर दुसरा म्हणाला, “गर्भधारणेची चमक स्पष्टपणे दिसत आहे”. या व्यतिरिक्त बरेच लोक त्यांच्यावर प्रेम ओतत आहेत. अरबाझ ५७ वर्षांचा आहे आणि शुरा ३५ वर्षांचा आहे. दोघांच्या वयात २२ वर्षांचा फरक आहे. परंतु अरबाझ म्हणाला होता की शुरा त्याच्यापेक्षा लहान आहे पण ती १६ वर्षांची नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय हवे आहे हे माहित आहे.
१९९८ मध्ये अरबाझने मलायका अरोराशी लग्न केले. त्याच्या मुलाचे नाव अरहान खान आहे. लग्नाच्या १९ वर्षानंतर अरबाज आणि मलायका यांनी २०१७ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. मग ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.