रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर बाप-लेकाची भेट झाली, अमोलला भेटताच अर्जुन भावुक, कडकडून मिठी मारताच रडू लागला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जून 17, 2024 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector serial update finally Arjun and Amol have met new promo viral on social media

अखेर बाप-लेकाची भेट झाली, अमोलला भेटताच अर्जुन भावुक, कडकडून मिठी मारताच रडू लागला अन्...

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. लीप घेतल्यापासून ही मालिका लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. सध्या या मालिकेत अर्जुन व अप्पी यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येत असल्याचं दिसून येत आहे. गेले काही दिवस अर्जुन व अमोल यांची भेट कधी होणार? याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता ही उत्सुकता पूर्ण होणार आहे. कारण अर्जुनला त्याचा मुलगा कोण आहे? हे कळणार आहे. या ट्विस्टबद्दलचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.

अप्पी-अर्जुनला एकत्र आणण्यासाठी सिंबा कसोशीने प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अपर्णा ड्रग्स माफीयांवर कारवाई करत आहे. ज्यामुळे तिची वरचेवर अर्जुनबरोबर भेट होत आहे. परंतु, त्यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्येच आता अमोल किडनॅप होणार आहे. ज्यामुळे या मालिकेला पुन्हा एक वळण मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘फादर्स डे’निमित्त एक नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये अर्जुन व अमोल एकमेकांना भेटतानाचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमदये अमोल किडनॅप झाला असून त्याला वाचवण्यासाठी अप्पी अर्जुनची मदत मागते. त्यामुळे लेकाचा जीव वाचवण्यासाठी अर्जुनही पोहोचतो आणि आपल्या लेकाला सोडवतो. पुढे अर्जुन व अमोल एकमेकांना घट्ट मिठी मारतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो सध्या सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

आणखी वाचा – “ते अजूनही ऑफिसला सायकलने जातात”, ‘फादर्स डे’निमित्त प्रथमेश परबची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “जीवनशैली बदलली तरी…”

या नवीन प्रोमोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या नवीन ट्विस्टची वाट पाहत होते. अशातच अमोल व अर्जुनची भेट होतानाचे पाहून प्रेक्षकही खुश झाले आहेत. या नवीन प्रोमोखाली अनेक चाहत्यांनी या भागाबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडला असल्याचेही कमेंट्सद्वारे म्हटले आहे.

आणखी वाचा – Video : कुशल बद्रिकेने शेअर केला बायकोचा रियाज करतानाचा व्हिडीओ, म्हणाला, “मी मध्ये काही बोललो तर…”

दरम्यान, अमोल भेटताच अर्जुन प्रचंड भावूक होतो. त्यामुळे आता अर्जुनला त्याचा लेक भेटल्यानंतर या मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार? अमोलला नेमकं कोणी किडनॅप केलं? या प्रकरणामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागांतून मिळतील.

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Riteish and Genelia Deshmukh shared a funny video on social media about the election 2024.

Video : “निवडणूक कोण जिंकणार?”, रितेशचा बायकोला थेट प्रश्न, जिनीलियाही उत्तर देत म्हणाली, “कोणीही जिंकलं तरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.