सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानी कुटुंबियांनी दिलेली लग्नपत्रिका आहे इतकी महागडी, पत्रिकेबरोबर दिली काश्मीरच्या पश्मिना शाल, किंमत आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 8:30 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant ambani Wedding invitation gift

अंबानी कुटुंबियांनी दिलेली लग्नपत्रिका आहे इतकी महागडी, पत्रिकेबरोबर दिली काश्मीरच्या पश्मिना शाल, किंमत आहे तब्बल...

अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. १२ जुलै रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर या भव्य लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राधिका व अनंतच्या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. या लग्नपत्रिकेबरोबर देण्यात येणाऱ्या खास स्पेशल भेटवस्तूने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. चांदीचा देव्हारा असणाऱ्या या लग्नपत्रिकेबरोबर खास भेटवस्तू देत त्यांनी पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. (Anant ambani Wedding invitation gift)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेच्या भव्य व विचारपूर्वक डिझाइनसाठीच नव्हे तर काश्मीरमधील कारागिरांनी हाताने बनवलेली दोरुखा पश्मिना शाल या उत्कृष्ट भेटवस्तूने देखील लक्ष वेधून घेतले आहे. अंबानी कुटुंबाने त्यांच्या लग्नातील पाहुण्यांना दोरूखा पश्मीना शाल भेट देण्यासाठी निवडली आहे. दोरुखा पश्मिना शाल कापडाच्या जगात लक्झरी व कलात्मकतेचे शिखर म्हणून उभी आहे. ही शाल अंबानी यांनी पाहुणे मंडळींना आमंत्रणासह भेट म्हणून दिली आहे.

आणखी वाचा – “माझ्यावर अन्याय झाला आहे”, पायल मलिकने पहिल्यांदाच अरमान मलिकच्या दुसऱ्या लग्नाबाबत केलं भाष्य, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काश्मीरमध्ये श्रीनगरच्या गाझी दूरी आलमगरी बाजारातील बेग कुटुंबातील गुलाम मुहम्मद बेग यांनी या ‘दोरूखा पश्मिना शाल’ कशी बनवली जाते, याचं महत्त्व काय आहे हे ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितलं. बेग म्हणाले की, “दोरुखा शालींवर नाजूक असं भरतकाम केलेलं असतं. ज्यामध्ये प्रति चौरस सेंटिमीटर एकूण ५०० टाके असतात. या शालीवरचं विणकाम हे खूपच गुंतागुंतीचं असतं कारण, या शालीवरची दोन्ही बाजूची डिझाइन तुम्हाला सारखीच दिसेल. त्यामुळे अशाप्रकारच्या दोरूखा पश्मिना शाल तयार करताना कारागीराचं कौशल्य पणाला लागतंच याशिवाय या कामासाठी प्रचंड संयम आणि वेळ द्यावा लागतो”.

आणखी वाचा – दागिने, इतक्या लाखांचा चेक अन्…; अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, ५० गरीब जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

पुढे ते असंही म्हणाले, “अनेकदा सुंदर अशा ‘दोरूखा जमावर शाल’ बनवण्यासाठी अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या शालींवर कोणत्या पद्धतीचं वर्क केलंय यावर त्यांची किंमत आधारलेली असते. साधारणत: हलक्या प्रतिचं विणकाम केलेली शाल तुम्हाला १० ते १२ हजारांपर्यंत मिळते तर, चांगल्या प्रतिचं विणकाम केलेली शाल निश्चितच यापेक्षा महाग असते”.

Tags: ambani familyanant ambanianant ambani weddingAnant ambani Wedding invitation gift
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Radhika Merchant and Anant Ambani pre-wedding rituals begun know more

राधिका-अनंतच्या लग्नाच्या आधीच्या विधींची सुरुवात, लग्नासाठी अंबानी कुटुंबियांची जय्यत तयारी, 'या' दिवशी होणार लग्न

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.