Aishwarya Narkar Slams Trollers : कलाकार म्हटलं की त्यांना ट्रोलिंगचा सामना हा करावा लागतोच. पण नेटकऱ्यांनीही या कलाकारांना कोणत्या गोष्टीसाठी ट्रोल करावे याचे भान आवश्यक आहे. बरेचदा ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत असतात. तर काही कलाकार नेहमीच काय बोलायचं असं म्हणत या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. या ट्रोलिंगला नेहमीच प्रतिउत्तर देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या नेहमीच त्यांचे हटके डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. बरेचदा त्या त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांच्यासह डान्स व्हिडीओ बनवून पोस्ट करतात. या नारकर कपलचे डान्स व्हिडीओ बरेच चर्चेत आलेलेही पाहायला मिळाले आहेत.
ऐश्वर्या यांना त्याच्या व्हिडीओवर नेटकरी बरेचदा नकारात्मक करत असतात. मात्र, या ट्रोलर्सची बोलती बंद करण्यात त्या कुठेही कमी पडत नाहीत. अभिनेत्रीने नुकताच त्यांच्या पतीसह एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. आणि यावर एका नेटकऱ्याने वाईट कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. याचा स्क्रिनशॉट घेत ऐश्वर्या यांनी त्या नेटकऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी चिकनी चमेली या गाण्याच्या म्युझिकवर डान्स केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तर काहींना त्यांचा हा डान्स खटकला आहे. नारकर कपलने सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या स्टेप्स करत या गाण्यावर ठेका धरला. यावर एका महिलेने कमेंट करत, “दोघांनापण म्हातारचळ लागलंय’, असं म्हणत डिवचलं. यावर ऐश्वर्या नारकर काही गप्प राहिल्या नाहीत. त्यांनी या महिलेला तिच्याच शब्दांत प्रतिउत्तर दिले आहे.
आणखी वाचा – “देशात काय चाललंय भान ठेवा”, नारकर कपलच्या डान्सवर नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या म्हणाल्या, “तुम्ही भारतीय ना…”
ऐश्वर्या यांनी महिलेच्या या कमेंटचा स्क्रिनशॉट घेत स्टोरीवर शेअर केला आहे. “दोघांनापण म्हातारचळ लागलंय”, असं म्हणणाऱ्या महिलेला “दूध का दूध पाणी का पाणी”, असं म्हणत त्यांनी उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या यांनी नकारात्मक कमेंट करणाऱ्या महिलेच्या अकाउंटवरील काही निवडक फोटोही या स्टोरीमध्ये पोस्ट केले आहेत. आणि “दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याआधी स्वतःकडे बघा”, असा सल्ला त्या महिलेला दिला आहे. इतकंच नाहीतर त्या महिलेला ही स्टोरी टॅगही केली आहे. याशिवाय ऐश्वर्या यांनी सकरात्मक कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांच्या कमेंटही स्टोरीमध्ये पोस्ट केल्या आहेत.