शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरकाम करणाऱ्या पारूला आणि डिलिव्हरी बॉयच्या वेशात आदित्यला पाहून अहिल्यादेवींना मोठा धक्का, घेणार मोठा निर्णय

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 10, 2025 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

घरकाम करणाऱ्या पारूला आणि डिलिव्हरी बॉयच्या वेशात आदित्यला पाहून अहिल्यादेवींना मोठा धक्का, घेणार मोठा निर्णय

Paaru Serial Update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार?, कोणता नवीन ट्विस्ट मालिकेचा संपूर्ण ट्रॅक बदलणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मालिकेत पारू आणि आदित्यवर मोठं संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, झी मराठी वाहिनीने मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये पारू आणि आदित्य दोघांनी त्यांचा नवीन संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पारू-आदित्यला घर चालवण्यासाठी पैशांची गरज भासते, ज्यामुळे ते दोघेही काम करण्याचा निर्णय घेतात. पारू अहिल्यादेवींच्या मैत्रिणीच्या घरी काम करते. यावेळी अहिल्यादेवी आणि किर्लोस्कर कुटुंबीय त्यांच्याकडे पाहुणे म्हणून येणार हे कळताच पारू मास्क लावून, म्हणजेच आपली ओळख लपवून, तिकडे काम करताना दिसते. पण या प्रोमोमध्ये अहिल्यादेवीला अजिबात माहिती नसतं की मास्क लावलेली ती मुलगी पारू आहे. दरम्यान, दामिनी पारूजवळ जाते आणि तिचा मास्क काढते, ज्यामुळे अहिल्यादेवीला समजतं की ती मुलगी पारूच आहे.

आणखी वाचा – सुभेदाराच्या घरात प्रियाच्या आई-बाबांची एंट्री, पण सायली-अर्जुनचा मोठा गैरसमज; मालिकेत मोठा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तर एकीकडे आदित्य डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना दिसतो. आणि त्याची पहिली ऑर्डर अहिल्यादेवींच्या त्या मैत्रिणीच्या घरचीच असते, जिथे तो पाहुण्यांसाठी बुके डिलिव्हर करायला येतो. पण डिलेव्हरी लेट आल्यामुळे त्याला डिलिव्हरीचे पैसे देण्यास नकार ते मालक देतात आणि त्याच्याशी चुकीचा व्यवहार करतात, ज्यामुळे आदित्य खूप दुखावतो. तितक्यात अहिल्यादेवी आणि बाकीचे घरातील सदस्य सुद्धा येतात आणि आदित्यची अवस्था पाहतात.

आणखी वाचा – बापाच्या कर्तव्याची, लेकीच्या प्रेमाची आणि कुटुंबाच्या जगण्याची ओढ; ‘तू माझा किनारा’ चित्रपटाचा ट्रेलर समोर

आता पारू आणि आदित्यला घरात पाहून अहिल्यादेवी कोणता निर्णय घेणार? या बिकट परिस्थितीत अहिल्यादेवी त्यांना घरात पुन्हा बोलावणार का? आणि मालिकेत आणखी कोणता नवीन ट्विस्ट येणार?, हे सारं मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Varinder Singh Ghuman death

शरीर काळं-निळं पडलं आणि…; अभिनेत्याच्या मृत्यूवर मित्र आणि कुटुंबीयांचा धक्कादायक दावा, मृत्यूस डॉक्टरांना जबाबदार धरले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.