Rahul Vaidya On turkey : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी करत भारताने पाकड्यांना हादरवून सोडलं. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवेळी अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आणि दहशतवादाला विरोध केला. या दरम्यान, तुर्की या देशाने मात्र भारताविरोधात जात पाकिस्तानला पाठिंबा दिला. यानंतर भारताने तुर्कीला बॉयकॉट करण्याचे ठरविले. यांत अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला. तुर्कीवर बहिष्कार घातलेल्या कलाकारांच्या यादीत गायक राहुल वैद्यचे नावही आले. त्याने अलीकडेच तुर्कीतील अंताल्या येथे ५ जुलै रोजी होणाऱ्या लग्नात गाणं सादर करण्यास नकार दिला आहे. यासाठी राहुलने ५० लाख रुपयांची ऑफर नाकारली आहे. हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रीय हितासाठी होता, असे गायकाने म्हटले.
राहुल वैद्य म्हणाला, “ही ऑफर खूप चांगली होती. ते मला ५० लाख रुपये देत होते. परंतु मी त्यांना सांगितले की, कोणतेही काम, पैसे आणि कोणतीही कीर्ती देशाच्या हितापेक्षा जास्त असू शकत नाही. त्याने मला आणखी ऑफर दिली, परंतु मी स्पष्टपणे सांगितले की यांत पैशाचा काहीच प्रश्न नाही आहे. त्यापेक्षा देशाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय नाही आहे, तो देशाबद्दलचा आदर आहे आणि आपण आपल्या देशाबरोबर कायम उभे राहावे”.
आणखी वाचा – दीपिका कक्करला मोठा आजार, पोटात ट्युमर अन्…; रुग्णालयात अशा परिस्थितीत आहे अभिनेत्री, व्हिडीओ समोर

त्याने या देशात जाण्याची किंवा काम करण्याची इच्छा नसल्याचेही स्पष्ट केले. तो म्हणाला, “माझ्या देशाचा शत्रू असलेल्या देशात जाण्यात मला रस नाही आणि त्याचा मी कदापि आदर करत नाही. मी आज जे काही आहे ते मी माझ्या देश आणि माझ्या देशवासीयांमुळे आहे. जो कोणी माझ्या देशाच्या आणि देशवासीयांच्या हिताच्या विरोधात आहे त्याला सहन केले जाणार नाही”.
तुर्कीबद्दल, त्यांचा असा विश्वास आहे की, तो भारताशी निष्ठावान नाही. राहुल म्हणाला, “भारतीय तुर्कीमध्ये बरेच पैसे खर्च करतात आणि आम्ही तेथे विवाहसोहळा करुन त्यांना एक मोठा व्यवसाय देतो. आम्ही त्यांना कोटींचा महसूल देतो आणि ते असे उत्तर देतात? आपल्याशी निष्ठावंत नसलेल्या देशात आपण पैसे का खर्च करावे? जो माझ्या देशाच्या विरोधात आहे तो माझ्याविरुद्ध आहे. हे इतके सोपे आहे”.