शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लोकांनी त्याचं…”, बिअर प्यायल्याच्या ‘त्या’ वक्तव्यावरील ट्रॉलिंगबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली, “अख्खी बाटली…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 29, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aditi Sarangdhar clarified about the trolling after her statement about drinking beer during pregnancy.

“लोकांनी त्याचं...”, बिअर प्यायल्याच्या ‘त्या’ वक्तव्यावरील ट्रॉलिंगबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली, “अख्खी बाटली…”

‘वादळवाट’, ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर. मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ते तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती तिच्या खाजगी जीवनाबद्दलची माहितीही देत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आई झाली. या गरोदरपणाच्या काळात तिला अजब डोहाळे लागले होते. यावेळी तिने मला बियर प्यायचे डोहाळे लागले असल्याचं वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे अदिती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती.

याबद्दल अदितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी अदितीने उगीच त्या गोष्टीला मोठं केलं असं म्हंटतीच्या त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अदितीने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात तिची बाजू मांडली आहे. याबद्दल बोलताना ती असं म्हणाली की, “खरंच डोहाळे लागले होते. मी अशी काय गटागटा बिअर पीत नव्हते, लोकांनी त्याचं चर्वण केलं. काय आहे ना ज्याला होतं त्याला ते कळतं. मी कधीही दारु प्यायले नाही आणि पितही नाही. पार्टीमधली सगळ्यात दुखी प्राणी मी आहे. माझी झोपायची वेळ झाली की माझी मी जेवते आणि झोपते. पार्टीमध्ये मी लिंबूपाणी पिते”.

आणखी वाचा – लाइट्स, ड्रामा आणि अ‍ॅक्शन! इतका भव्यदिव्य आहे संकर्षण व अमृता यांच्या नव्या शोचा सेट, पाहा Inside Video

यापुढे ती असं म्हणाली की, “मी तेव्हा इतकं थंड पाणी प्यायचे की, जे आयुष्यात कधीच प्यायले नव्हते. मी गरम गरम पाणी पिणारी मुलगी आणि मला बर्फ असलेलं पाणी प्यावसं वाटायचं. मी काही बिअरची अख्खी बाटली नाही प्यायचे, एक घोट अगदी. तो वास एवढंच. नाहीतर माझी चिडचिड व्हायची. ते डोहाळे होते. मी खूप डाएट करणारी मुलगी आहे. मी बाहेरचा वडापाव अनेक वर्ष खाल्ला नव्हता. मी बाहेर जेवले नव्हते. पण मला अतरंगी डोहाळे लागले होते. उलट्या तर भयानक. तेव्हा नऊ महिने मला दिवसांत २५ उलट्या व्हायच्या. १० पावलं चालल्यावर मला उलटी व्हायची. त्यामुळे मी माझं ‘लक्ष्य’चं शूट थांबवलं. मी दोन नाटकेही सोडली. त्या परिस्थितीत मी स्टेजवर उलट्या केल्या असत्या. ही माझी तेव्हाची परिस्थिती होती”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वासाठी चाहत्यांसह जुने स्पर्धकही उत्सुक, रितेश देशमुखचा ‘लय भारी’ स्वॅग पाहून म्हणाले, “खरा चेहरा…”

दरम्यान, गरोदरपणाच्या बियर पिण्याबद्दल अदितीने “गरोदरपणाच्या सुरुवातीला मी खूपच उत्सुक होते. मला तेव्हा बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मी भारतीय पदार्थ काही खाल्लेच नाहीत. मी तेव्हा फक्त सलाड खायचे आणि बिअरच प्यायचे” असं म्हटलं होतं.

Tags: aditi sarangdharmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
30 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

रविवारी कन्या राशीसह ‘या’ ५ राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा, आवडीची नोकरी व व्यवसायात मिळेल यश, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.