अनेक नवीन कलाकार सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. या नवीन कलाकारांदेखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. परंतु काही कलाकार हे कायम प्रेक्षकांचे लाडके कलाकार असतात. यात एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ती म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर.सई तिच्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजाने कायमच प्रेक्षकांना भुरळ घालते. (sai tamhankar on marathi industry)
नुकतीच सईने अवधूत गुप्तेंच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यादरम्यान सईने बरेच किस्से सांगतिले. तेव्हाचा सईने सोनाली व तिच्या नवऱ्याला उपाशी ठेवलं हा किस्सा खूपच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. याचसोबत सिनेसृष्टीबाबत महत्वाचा खुलासा देखील सईने केला आहे.
पाहा काय म्हणाली सई? (sai tamhankar on marathi industry)
अवधूत गुप्तेंनी सईला मराठी सिनेसृष्टीमध्ये पुरुषांना जशी वागणूक दिली जाते,तशी स्त्रियांना दिली जात नाही असा प्रश्न विचारला.त्यावर सई म्हणाली, पुरुषांचं यश स्त्रियांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने साजरं केलं जात. समान वेतन वैगरे या खूप दूरच्या गोष्टी आहेत.त्या तर अजून सिनेसृष्टीत घडल्याचं नाहीत. सईच्या या उत्तराने अनेकांना चकित केले आहे. (sai thamhnkar on equality)

मराठी सिनेसृष्टीप्रमाणे सईने बॉलीवूड मध्ये देखील तिच्या कामाची छाप पाडली आहे.सई तिच्या कामासाठी जितकी ओळखली जाते,तितकीच तिच्या हटके लूकसाठी देखील प्रसिद्ध आहे.हल्लीच ‘दुनियादारी’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली.त्यानिमित्त सईने रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केले होते, तेव्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा शिरीनची आठवण झाली.सई तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तितकीच ओळखली जाते.तसेच सई महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हे देखील वाचा : ‘बिग बॉस OTT’ फेम मराठमोळा अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल, कारण अस्पष्ट