आपल्या सालस आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.’माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘सुखांच्या सरीने हे मन बावरे’ अशा अनेक मालिकांमधून मृणालने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.आणि मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचलेले कलाकार कायम प्रेक्षकांच्या मनात राहतात. (mrunal dusanis new york trip)
पंरतु लग्न झाल्यानंतर मृणालने फार काम केलं नाही सध्या ती सिनेसृष्टीपासून लांब आहे.पती नीरज व मुलगी नुरवी सोबत मृणाल सध्या अमेरिकेत स्थित आहे.पती आणि मुलीसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ मृणाल तिच्या सोशल मीडियावरून शेअर करत असते.
पाहूया मृणालच्या न्यू यॉर्क ट्रीपची खास झलक (mrunal dusanis new york trip)
असाच एक न्यूयॉर्क ट्रिपचा व्हिडिओ मृणालने तिच्या इंस्टग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.’once upon a time in new york’ असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलेलं पाहायला मिळत. चला पाहूया मृणालची लेकीसोबतच्या न्यू यॉर्क ट्रीपची खास झलक (mrunal dusanis daughter)
मृणालच्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी ते तिला मिस करत असल्याची कबुली दिली आहे.’ताई लवकर परत ये २ वर्ष झाली तू दिसत नाही आहेस, तू गेल्या पासून मी एक ही मालिका पहिली नाही’,’ताई तुमची मालिका हे मन बावरे मी तीन वेळा पाहिली लवकर परत या आणि नवीन मालिका करा’ अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळाल्या.आपलं काम प्रेक्षकांच्या लक्षात राहणं आणि आपण सतत त्यांना नवीन भूमिकेत दिसत राहावं ही त्यांची इच्छा असणं ही एका कलाकारासाठी खऱ्या अर्थाने त्याच्या कामाची पोचपावती आहे. मृणालच्या कमबॅकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे देखील वाचा : बापलेकीच्या संभाषणात प्रेक्षक करतायत उर्मिलाला मिस, कमेंट करत म्हणाले “जिजाच्या मम्मीचं..”