शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर नवरा सॅम बॉम्बेची प्रतिक्रिया, घटस्फोट झाला नसल्याच्याही केला खुलासा, म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 4:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress model Poonam pandey husband sam Bombay reacts on her death also revealed that there was no divorce

पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर नवरा सॅम बॉम्बेची प्रतिक्रिया, घटस्फोट झाला नसल्याच्याही केला खुलासा, म्हणाला...

प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे ही अगोदर तिच्या निधनाच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर काल तिने तिच्या जिवंत असण्याच्या एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचे कारण ठरताना दिसत आहेत. पूनम पांडेचे निधन झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. यावर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांकडून अभिनेत्रीच्या या खोट्या व चुकीच्या वागणुकीवर सडकून टीका करण्यात आली. अशातच आता अभिनेत्रीच्या नवऱ्यानेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्तान टाईम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सॅम बॉम्बे यांनी पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीबद्दल प्रतिक्रिया दिली असून तिचे निधन ही एक खोटी बातमी आहे, हे कळताच त्यालाही धक्का बसला. यावेळी तो म्हणाला की, “तिने जे काही केले याचा मला आनंद आहे. ती जिवंत आहे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. अलहमदुलिल्लाह.”

आणखी वाचा – “कॅन्सरसारख्या आजाराची चेष्टा…”, पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “बहिष्कार टाकावा अन्…”

यापुढे सॅमने खुलासा केला की, त्याचा व पूनम पांडेचा अद्याप घटस्फोट झालेला नाही आणि तो म्हणाला की, “ती जिवंत आहे याचा मला आनंद आहे. माझं ऐका, जर कोणी एखाद्या मुद्द्याबद्दल जागरुकता निर्माण करत असेल आणि यासाठी एखाद्याने त्याच्या प्रसिद्धीची किंवा प्रतिमेची पूर्ण अवहेलना केली तर त्याचा पण आदर करूया. पूनम पांडे कालातीत आहे. ती सर्वात धाडसी भारतीय महिला आहे काही वर्षांनी तिचे हे प्रयत्न आनंदाने साजरे केले जाईल.” 

आणखी वाचा – अभिनय, निर्मितीनंतर आता ओटीटीवरही झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, हिंदी वेबसीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

दरम्यान, शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी पूनम पांडेच्या टीमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये अभिनेत्रीचे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे निधन झाले असल्याचे म्हटले होते, तथापि, दुसऱ्याच दिवशी, अभिनेत्रीने प्रेक्षकांना ती जिवंत असल्याचे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आणि स्वतःच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले. अभिनेत्रीने केलेल्या या स्टंटवर अनेक कलाकार व नेटकऱ्यांकडून सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainmentbollywood newspoonam pandeyPoonam Pandey Death Fake Newssam Bombayपूनम पांडेपूनम पांडे मृत्यू खोटी बातमीबॉलीवूड अभिनेत्रीबॉलीवूड बातमीबॉलीवूड मनोरंजनसॅम बॉम्बे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
actress jyoti chandekar re enter in the Tharala tar mag serial daughter tejaswini pandit shared post

‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीचं आजारपणानंतर कमबॅक, लाडकी लेक व अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.