उरण येथे घडलेल्या यशश्री शिंदे प्रकरणामुळे उरणसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्री शिंदे ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. २२ वर्षीय यशश्री शिंदे गेल्या २५ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपामध्ये यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करून तिला टाकण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणी समाजमाध्यमांमध्ये आता प्रतिक्रिया उमटत आहेत. तिला न्याय मिळावा यासाठी नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावद्वारेही या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेनेदेखील तिचा राग व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर अनेकदा चिथावणीखोर भाष्य करत कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. केतकी अनेक राजकीय व सामाजिक प्रश्नांवर आपल्या भूमिका मांडत असते. केतकी अनेकदा तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे वादाचे कारण बनली आहे. अशातच सध्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या यशश्री प्रकरणामुळे केतकी चर्चेत आली आहे. केतकीने यशश्री प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर कला आहे. यशश्रीला न्याय मिळालाच पाहिजे, असं म्हणत तिनं लव्ह जिहाद हा मुद्दाही यातून मांडला आहे.
आणखी वाचा – श्रावण महिन्याची प्रेक्षकांना खास भेट, ‘जय भोले’ गाणं सर्वत्र प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?
केतकीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “लव्ह जिहाद फक्त बिहारमध्ये होत आहे, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त केरळमध्ये होत आहे, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये होत आहे, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होत आहे हे खोटं आहे. लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत, हे खोटं आहे आणि जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद होत आहे”.
यापुढे तिने “आपल्या मुली गायब होत आहेत. त्या कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात, तर कधी समुद्रात. नाही तर सुटकेसमध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आता आपल्याला धर्मासाठी लढायचं आहे. पोलिस आपल्या बाजूने नाहीत. प्रशासन आपल्या बाजूनं नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव” असं म्हणत तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, केतकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. यामुळे यशश्री प्रकरणाबद्दलही लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे.