Amruta Subhash Shocking Revelation : सध्या अत्याचार, फसवणूक यांसारख्या अनेक काळजाला भिडणाऱ्या बातम्या सतत कानावर येत आहेत. अशातच आक्षेपार्ह मॅसेज करत अत्याचार करणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्यालाही मराठमोळ्या अभिनेत्रीने सुनावलं आहे. सध्या प्राची पिसाट आणि सुशील म्हशीलकर यांचे संभाषण चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. प्राचीने अश्लील मॅसेज करणाऱ्या सुशीलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला. अर्थात प्राचीच्या या निर्णयाचं सर्वत्र धाडसाने कौतुकही केलं जात आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्राचीप्रमाणेच अनेक महिला कलाकार आहेत ज्या लहान-सहान चुका दाखवून देत स्पष्टपणे भाष्य करतात. तर काही अभिनेत्री त्यांच्यावर होणारा अन्यायाबाबत भाष्य करणं टाळतात.
अशातच एका अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला संतापजनक अनुभव शेअर केला आहे. एका लोकप्रिय निर्मात्यानं अमृताला चुकीचा स्पर्श केला होता, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता सध्या जारण या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. अमृता सोशल मीडिया वा मुलाखतींमार्फत अनेकदा आपली ठाम मतं मांडताना दिसते.
अमृताने नुकत्याच ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत या संतापजनक अनुभवाबाबत भाष्य केलं आहे. एका निर्मात्याने केलेल्या या कृतीबाबत त्याने भाष्य करत असं म्हटलं की, “‘हे काय करतोय तू? हा काय प्रकार?’, असं मी त्याला म्हणाले. यावर त्याने उत्तर देत तुझा टॉप वर गेलेला, असं म्हणत माझ्या कपड्यांना दोष दिला. यावर मी त्याला पुन्हा फटकारलं होतं. माझे कपडे नीट करणं हे तुझं काम नाही आहे, मला अशा प्रकारे स्पर्श करण्याची तुझी हिंमतच कशी झाली”.
पुढे त्याने असं म्हटलं की, “निर्मात्यांकडून झालेले असे प्रकार खरं तर वारंवार समोर येत असतात. पण काम न मिळण्याच्या भीतीमुळं अनेक अभिनेत्री गप्प बसतात. पण अमृतानं मात्र निर्मात्याला चांगलाच धडा शिकवला होता. ही घटना माझ्याबरोबर घडली तेव्हा, अनेकजण म्हणाले की, आता तुला काम मिळणार नाही. पण मला काहीच फरक पडला नाही. मी अशा गोष्टींना कधीच थारा दिला नाही”.