मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता नृत्यातही पारंगत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची व नृत्यविष्काराची झलक सर्वांना दाखवली आहे. आपल्या अभिनय व नृत्याने चर्चेत राहणारी अमृता सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सोशल मीडियावरील तिचे आईबरोबरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधून तिचा आईबरोबरचा खास बॉण्ड दिसून येतो. अशातच अमृताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (amruta khanvilkar mother’s hand injured)
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आईचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई हॉस्पिटलमध्ये असून तिच्या आईच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दुखापतीचे कारण अमृता आईला विचारते. मात्र त्या काही सांगत नाहीत. त्यामुळे अमृताच आईला झालेल्या दुखापतीबद्दल सांगू लागते. याबद्दल ती असं म्हणते की, “आमच्या आईसाहेबांनी हात तोडून घेतलेला आहे. नव्या घरी रिक्षाने येत असताना आई आणि आमची मदतणीस ज्या रिक्षात होती. त्या रिक्षाला कुणीतरी धडक दिली. नंतर एक अख्खा दिवस आईने मला काहीच सांगितलं नाही की, तिचा हा अपघात झाला आहे.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! शशांक केतकरच्या घरी चिमुकलीचं आगमन, घरीच केलं बारसं, नाव ठेवलं…
यापुढे अमृताने असं सांगितलं की, “पुढच्या दिवशी मी सकाळी पाहिलं की, तिचा हात प्रचंड काळा-निळा झाला आहे. तेव्हाही ती काही बोलली नाही. मला म्हणाली की मला लिफ्टचा दरवाजा लागला आहे. तर म्हटलं बघू म्हटलं काय झालं? त्यानंतर आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा कळलं की, तिचा (collarbone) म्हणजेच तुमचा हात तुमच्या शरीराशी जोडतो ते हाड तुटलं आहे”.
आणखी वाचा – कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली कश्मिरा शाह, नवऱ्याने उचलण्याचा प्रयत्न केला पण…; Video Viral
दरम्यान, अमृताच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच ‘संगीत मानापमान’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या ‘वंदन हो’ गाण्यातील नृत्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याआधी ती ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटात महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसली होती. तसंच ‘लाइक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातही ती एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.