Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू -काश्मीर येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या हल्ल्यात २६ निरपराध लोकांना आपला जीव गमावला. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घातल्या. हा हल्ला असल्याने प्रत्येकजण दु: ख आणि राग व्यक्त करताना दिसत आहे. बॉलिवूडमधील सेलेब्सही या हल्ल्याचा जोरदार निषेध करीत आहेत. दरम्यान अभिनेता सुनील शेट्टी यांनी असेही सांगितले की, काश्मीर आमच आहे आणि पुढील सुट्टी मी काश्मीरमध्येच एन्जॉय करेल. कश्मीरच्या पहलगाम परिसरात नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं असताना, अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी धाडसी पाऊल उचलत तेथे भेट दिली.
या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक पर्यटकांनी आपले दौरे रद्द केले आहेत, तर काही जण तातडीने परतले आहेत. मात्र, अशा संकटातही अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरला भेट देत स्थानिकांप्रती आपले प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आणि अतुल कुलकर्णी यांचा हा धाडसीपणा पाहता सोशल मीडियावर त्यांचं जोरदार कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ३९ वर्ष बँकेत नोकरी, ६०व्या वर्षी सेवानिवृत्ती अन्…; ‘होणाऱ सून…’मधील शशीकला सध्या काय करते?
अतुल कुलकर्णी पोहोचले पहलगमला
अभिनेते अतुल कुलकर्णी कश्मीरला पोहोचले आहेत. त्यांनी पहलगमची अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. एक पोस्ट शेअर करत त्यांनी असेही लिहिले आहे की, “हिंदोस्तां की ये जागीर है के डर से हिम्मत भारी है, हिंदोस्तां की ये जागीर है के नफ़रत प्यार से हारी है, चलिए जी कश्मीर चलें, सिंधु, झेलम किनार चलें, मैं आया हूँ , आप भी आएँ”, असं कॅप्शन देत त्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा – अपघातानंतर परेश रावल प्यायचे स्वतःचीच लघवी, अभिनेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “बियरसारखी लघवी प्यायचो कारण…”
अतुल कुलकर्णी यांनी मुंबईहून श्रीनगरला विमानाने प्रवास केला. या दरम्यान, त्यांनी रिकाम्या विमानाचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “क्रूने सांगितले की त्यांची विमाने भरून जात होती. आणि आता त्यांना ही विमाने पुन्हा भरायची आहेत. चला काश्मीरला जाऊया. आम्हाला दहशतीचा पराभव करावा लागेल”. अतुलने काश्मीरच्या सुंदर मैदानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत आणि असे लिहिले आहे की, “काश्मीरला येणे आवश्यक आहे”.
या व्यतिरिक्त अतुल कुलकर्णी यांनी ‘एबीपी माझा’ यांच्याशी संभाषणात सांगितले की, “हे दहशतवादी काय आहेत, त्यांनी काय केले? त्यांना काय म्हणायचे आहे? तर ते आपल्या सर्वांना काश्मीरला येऊ नका असे सांगत आहेत. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की भाऊ, आम्ही आपले ऐकणार नाही. आम्ही येथे मोठ्या संख्येने येऊ. आम्ही पहलगममध्ये बसलो आहोत, ही माझी एकमेव विनंती आहे, जर आपण बुकिंग रद्द केले असेल तर कृपया पुन्हा बुकिंग करा”.