नुकत्याच जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी जगाचा निरोप घेतला. ६ जून २०२३ रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपिस्थत होते. जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी देखील सुलोचना लाटकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अशोक सराफ यांनी सुलोचना यांच्या सोबत एक डाव भुताचा, भन्नाट भानू तसेच हिंदी मधील घर घर कि कहाणी, फुलवारी अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये का केले आहे.(Ashok saraf Sulochana Latkar)

सुलोचना लाटकर यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते सचिन पिळगांकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ तसेच राजकीय क्षेत्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्राचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
सुलोचना लाटकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मराठी मधील साधी माणस, सांगते ऐका अशा अनेक तर हिंदी मध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम करून सुलोचना यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले होते.
सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, समृद्धी केळकर, रुपाली भोसले, रसिका वेंगुर्लेकर, जुई गडकरी. गौरी किरण, प्रिया बापट या कलाकार मंडळींसुद्दा सुलोचना दीदी यांच्या जाण्याने भावुक झालेले पाहायला मिळाले.(Ashok saraf Sulochana Latkar)