हल्ली बॉलीवूड मध्ये आत्महत्येचं सत्र वाढल्याचा पाहायला मिळतंय. पण या नक्की आत्महत्या आहेत कि खून हे कळायला काही मार्ग नाही. काही वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाबाबत अजून ही गूढ कायम आहे. हा निकाल अजून लागला नसताना आज बॉलीवूड ला आणखी एका अभिनेत्याला मुकावं लागलं आहे.
राहत्या घराच्या बाथरूम मध्ये अभिनेता आदित्यची बॉडी पोलिसांना मिळाली. आदित्य मुंबईत एकटा राहत होता त्याला प्राण्यांची प्रचंड आवड होती. असं त्याच्या खास मैत्रिणीने आज ताक ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. आदित्यने जाहिरातींमधून, चित्रपटांमधून, तर मालिकांमधून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच स्प्लिट्सविला ९ च्या भागाचा ही तो भाग होता.

Sushant Singh – Aaditya Singh Death
विशेष म्हणजे या अभिनेत्याचं नाव आदित्य सिंग राजपूत आणि या अभिनेत्याच्या निधनाचे नक्की कारण अद्याप ही गुलदस्त्यात आहे. राजपुताना, लव्ह, आशिकी, कोडरेड अशा अनेक मालिकांमध्ये देखील आदित्य ने काम केले होत्ते. अभिनय सोबतच आदित्यला मॉडेलिंग, डाँसिन्गची देखील आवडत असल्याचं सांगितलं जातंय. आता आदित्यसिंग राजपूतच्या निधनाच खरं कारण समोर येणार कि सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या करणासारखं हे गुड राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.