मराठी मनोरंजन सृष्टीत नवरा-बायको प्रमाणेच काही सासू-सूनांची जोड्याही लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची जोडी. दोन वर्षांपूर्वी वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी लग्नगाठ बांधली. मृणाल कुलकर्णी आणि शिवानी यांचं खूप खास नातं आहे. दोघी ,सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर टया एकमेकींबद्दलच्या अनेक खास पोस्ट शेअर करत असतात. शिवानी मृणाल कुलकर्णी यांची खूप लाडकी आहे. त्या वेळोवेळी सोशल मीडियावरून सूनेचं कौतुक करत असतात. अशातच मृणाल यांनी पुन्हा एकदा सूनेबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. (Mrinal Kulkarni praised Shivani Rangole)
मृणाल यांनी नुकताच इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना सून शिवानी रांगोळेबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत मृणाल असं म्हणाल्या की, “मला दुसरी मुलगीच झाली आहे. मी म्हणते मला पंचविशीची मुलगीच झाली आहे. देवाने थेट बनवून माझ्याकडे तिला पाठवली आहे. सासू आणि सून असे आमची काहीही अनुभव नाहीत. आम्ही छान मैत्रीणींसारख्या राहतो आणि बागडतो. माझ्या अनुभवांचा तिला फायदा होतो आणि तिच्या नवीन विचारांचा तसंच या पिढीशी जुळवून घेताना कसं वागायचं या अनुभवचा मला फायदा होतो”.
मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानी व विराजस अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांना आयुष्याचं जोडीदार म्हणून निवडलं. विराजसची आई व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची शिवानी यांच्या सासू-सुन या नात्यापेक्षा त्या एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी आहेत. त्या दोघींमध्ये खूप छान बाँडिंग आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
दोघींच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मृणाल यांचा नुकताच ‘गुलाबी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर शिवानी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसंच मालिकेत येणारे नवीन ट्विस्ट चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतात.