Vikrant Massey Retirement : “12 th फेल अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्याने केलेल्या घोषणेने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. विक्रांतने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनंतर चाहते दु:खी झाले आहेत. अभिनेत्याच्या चित्रपटसृष्टीला निरोप देण्यामागच्या कारणांबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. सध्या विक्रांत मेस्सी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला. प्रदर्शनानंतर हा चित्रपट अनेक वादात अडकला आहे. विक्रांत चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा विक्रांत मेस्सी आणि त्याच्या नऊ महिन्यांच्या मुलाला धमक्या आल्या होत्या. याबाबत स्वतः अभिनेत्याने खुलासा केला. ‘12 th फेल’ आणि ‘सेक्टर ३६’ या चित्रपटांमुळे मिळालेल्या यशाचा फायदा घेऊन विक्रांत पुढे जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र या अभिनेत्याने वयाच्या ३७व्या वर्षी अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंकव्हिलाशी बोलताना विक्रांतने या निर्णयाबाबत खूप मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना विक्रांत म्हणाला की, “या लोकांना माहित आहे की मी नुकताच एका मुलाचा बाप झालो आहे, ज्याला अजून चालताही येत नाही. ते लोक त्याचे नाव ओढत आहेत. मला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. आपण कोणत्या समाजात राहत आहोत?”, असा सवालही त्याने यावेळी बोलताना केला. ‘साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात राशि खन्ना, रिद्धी डोगरा आणि बरखा सिंग यांसारखे कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे.
आणखी वाचा – धक्कादायक! विक्रांत मेस्सीचा इंडस्ट्रीला कायमचा निरोप, अभिनय सोडणार, म्हणाला, “गेले काही दिवस…”
एकता कपूरने स्वतः या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. यानंतर आता विक्रांतने २०२५ नंतर अभिनयातून निवृत्त होणार असल्याची घोषणा करुन त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नोटमध्ये त्याने लिहिले की, “गेली काही वर्षे आणि त्याआधीचा काळ आश्चर्यकारक होता. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, परंतु जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवले की एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणूनही आता स्वतःला साजेशी आणि घरी परतण्याची वेळ आली आहे”.
विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सेक्टर ३६’ या चित्रपटात दिसला होता. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘ब्लॅकआउट’मध्येही त्याने काम केले. विक्रांतची सर्वाधिक चर्चा ’12 th फेल’ चित्रपटामुळे झाली. या चित्रपटात तो मनोज कुमार शर्माच्या भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. आता विक्रांतच्या हातात ‘यार जिगरी’, ‘टीएमई’ आणि ‘आँखों की गुस्ताखियां’सारखे चित्रपट आहेत. त्यांचे शूटिंग सुरु असून काही पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहेत.