सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत लागू होणार ‘आणीबाणी’

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 29, 2023 | 2:09 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Aanibani New Marathi Movie

Aanibani New Marathi Movie

मराठी चित्रपटसृष्टीत अनेकवेळा वेगळ्या धाटणीचे विषय घेऊन आलेले आहे. त्यात सामाजिक, राजकीय यांसारख्या अनेक विषयांवर उत्तम दर्जाचे चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. अश्याच धाटणीचा एक सिनेमा ज्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती, तो चित्रपट म्हणजे ‘आणीबाणी’ येत्या २८ जुलैला राज्यातील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.(Aanibani New Marathi Movie)

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.

या ‘आणीबाणी’चा जनतेला कोणताही त्रास न होता, फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला मिळणार आहे. कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखकाच्या सोबतीने दाखवलं आहे.

(Aanibani New Marathi Movie)

मनोरंजनाची आणीबाणी(Aanibani New Marathi Movie)

आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची. नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.(Aanibani New Marathi Movie)

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

(Aanibani New Marathi Movie)

प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे असे नामांकित कलाकार ईत्तर आल्यावर या आणीबाणी मध्ये नक्की काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: 48 years since EmergencyAaneebani which is a hard hitting politicalAaneebani will release in MaharashtraAaneebani will release in Maharashtra on July 28AanibaniAanibani castAanibani in MaharashtraEmergency rarely commenting on political issueshard hitting political commentaryMarathi movies on AndbaaniNext month there will be Aanibanipravin tardesayaji shindeupendra limiyeअरविंद जगतापआणिबाणी या विषयावरील मराठी चित्रपटआणीबाणीतील कलाकारआणीबाणीला ४८ वर्षे पूर्णइमर्जन्सी किंवा आणीबाणीदिनेश जगतापराजकीय विषयावर मिश्किल भाष्य करणारा आणीबाणी
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Kedar Shindes Special Post

'अशी लोकं आता देव बनवायला विसरलाय' सुक्कुताईसाठी केदार शिंदेची पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.