२०२० मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जगच अचानक थांबलं होत. आणि त्यातच १४ जून २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येची बातमी समोर आली.आणि सिनेसृष्टी सोबतच प्रेक्षकांना ही मोठा धक्का बसला.त्यानंतर हे प्रकरण पुढे खूप चिघळत जाऊन वेगळ्या वेगळ्या वळणावर गेलं.आज या गोष्टीला आज तीन वर्ष पूर्ण झाली तरी या प्रकरणाविषयी काहीही ठोस पुरावा हाती लागेलेला नाही. (Sushant Ankita Breakup Story)
सुशांत सिंगच्या मृत्यूची बातमी जेव्हा समोर आली,तेव्हा अभिनेत्री अंकिता लोखंडे विशेष चर्चेत आली,तेव्हा सुशांत आणि अंकिताच्या रिलेशनशिप विषयी चर्चा सुरु झाल्या.सुशांतच्या मृत्यूवेळी अंकिताला मोठा धक्का बसला होता.ते दोघे एकत्र नसूनही अंकिता त्यावेळी सुशांतच्या घरच्यांना आधार देताना बघायला मिळाली.
पाहा का तुटलं सुशांत अंकिताचं नातं? (Sushant Ankita Breakup Story)
अंकिता आणि सुशांत बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते, ते दोघे एकत्र पवित्रा रिश्ता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकले होते. या मालिकेच्या वेळीच ते दोघे एकमेकांना भेटले.ऑनस्क्रीन त्यांची केमेस्ट्री जशी फुलत होती. तस तस त्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग देखील चांगलं होत होत. या मालिकेच्या दरम्यानच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. बरेच वर्ष त्यांचं रेलेशिनशिप होत.
या मालिकेनंतर सुशांत चित्रपटाकडे वळला.परिणीती चोप्रा आणि सुशांत ही फ्रेश जोडी ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि सुशांतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.हे अंकिताला खटकत होत.या चित्रपटामध्ये परिणीती आणि सुशांत लिपलॉक करताना देखील पाहायला मिळाले. त्यांच्या या लिपलॉकमुळे अंकिता अस्वस्थ होती.आणि तेव्ह तिने सुशांतच्या कानाखाली मारली होती.(Sushant Ankita Breakup Story)
हे देखील वाचा : “मी अभिनेत्री आहे म्हणून तो मला सोडून गेला…” EX बॉयफ्रेंड बद्दल मृणालने केला खुलासा