मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुनील तावडे हे गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांच्याच पाउलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शुभंकर तावडेदेखील या क्षेत्रात आला आहे. शुभंकरने आजवर अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा शुभंकर हा सोशल मीडियाद्वारेही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच नुकताच अभिनेत्याचा वाढदिवस झाला. (Shubhankar Tawde New Car)
शुभंकरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आपला वाढदिवस मित्रमंडळींसह जल्लोषात साजरा केल्यावर शुभंकरने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शुभंकर तावडेने त्याच्या ३० व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. या वाढदिवसाला त्याने कार खरेदी केली आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि नव्या कारचे फोटो शुभंकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर त्याच्या मित्रमंडळी आणि चाहत्यांसंह इतर सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शुभंकरने सोशल मीडियाद्वारे त्याच्या नव्या गाडीची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तावडे कुटुंबीयांनी या गाडीचं नाव ‘लक्ष्मी’ ठेवलं आहे, तर शुभंकर या गाडीला ‘फनकार’ नाव ठेवल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसंच त्याने यापुढे असं म्हटलं आहे की, “मी ३० वर्षांचा झालो…नवीन गाडी घेतली. तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. मी मात्र, अजूनही या गाडीला ‘फनकार’ किंवा Fun-Car म्हणतो. याशिवाय माझ्या ‘विषामृत’ची या नवीन नाटकची घोषणा करण्यात आली आहे. मला तुम्हा सर्वांकडून भरभरून शुभेच्छा आणि प्रेम मिळालं. वाढदिवसाची पार्टीसुद्धा केली”.
आणखी वाचा – अर्जुन कपूर व मलायका अरोरा कायमचे विभक्त?, ब्रेकअपच्या चर्चांवर अभिनेत्याचा शिक्कामोर्तब, म्हणाला…
दरम्यान, शुभंकरच्या या पोस्टखाली अनेक कलाकारांनी त्यांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. नेहा पेंडसे, ईशा केसकर, पूर्वा शिंदे, आरती मोरे, प्रथमेश परब, अजिंक्य राऊत अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त व त्याच्या नवीन गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्याचं कौतुकही केलं आहे.