Sonali Bendre Orry Viral Video :सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचे जोरदार सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. अशातच चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी काल रात्री म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी एक भव्य दिवाळी पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये बी-टाऊनचे अनेक बडे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यांचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहेत. या पार्टीचा एक व्हिडीओ नेहमीच चर्चेत असणाऱ्या ओरीने शेअर केला आहे. यामध्ये सोनाली बेंद्रेसह ओरी दिसत आहे. हा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
खरं तर, ओरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अंबानीपासून ते अनेक बॉलिवूड कलाकार त्याचे मित्र आहेत. बॉलिवूडच्या मोठमोठ्या पार्टीला ओरीला आवर्जून आमंत्रण दिलं जातं. ओरीने रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीतही हजेरी लावली होती. जिथून त्याने आता सोनाली बेंद्रेबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. ओरीने दोन व्हिडीओचा कोलाज शेअर केला आहे. ज्यामध्ये तो व सोनाली दिसत आहे.
आणखी वाचा – “तुमची मुलगी प्लेन क्रॅशमध्ये…”, काजोलच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईला बसला धक्का, प्रसंग सांगत म्हणाली…
दुसरा व्हिडीओ थोडा जुना आहे. यांत फक्त बॉलीवूडचे कलाकार दिसत आहे. यात जया बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चनबरोबर सहभागी झाली होती. हे दोघेही पापाराझींसाठी पोज देत असताना सोनाली बेंद्रे तिथे दाखल झाली. सोनालीला पाहून श्वेता एकत्र पोज देण्यास तिला बोलावते आणि श्वेताच्या विनंतीवर सोनालीही येते. पण सोनाली श्वेताकडे येताच जया बच्चन खूप रागावतात आणि तिथून निघून जातात. यावरुन जया बच्चन यांना खूप ट्रोलही करण्यात आले.
आता ओरी व सोनालीने हा क्षण पुन्हा तयार केला आहे. या लेटेस्ट व्हिडीओमध्ये ओरीने जया बच्चनची कॉपी केली आहे. मग सोनाली त्यांच्याकडे येताच ओरीही जयाप्रमाणे तिथून निघून जातो. हा व्हिडीओ शेअर करताना ओरीने लिहिले आहे की, “सामाजिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच माझा मूड असा असतो”. आता नेटकरीही ओरीच्या या व्हिडीओवर विविध प्रकारे कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की, “जया जी तुम्हाला कधीही माफ करणार नाही”. काही सेलिब्रिटींनी कमेंटमध्ये या व्हिडीओला मजेदार म्हटले आहे.