Abhishek Bachchan-Nimrat Kaur Affair Rumours : अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे बॉलिवूड कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या १७ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या अफवा आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये असे दावेही करण्यात आले होते की, त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून ते वेगळे होऊ शकतात. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकजण ‘लंचबॉक्स’ फेम अभिनेत्री निम्रत कौरचे नाव अभिषेक बच्चनबरोबर जोडत आहेत. निम्रतमुळे ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होऊ शकतो, असा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे काही नेटकरी दोघांच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे कारण निम्रत असल्याचं म्हणत आहेत.
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच नेटकरी या अफवांना दुजोरा देताना दिसत आहेत. ट्विटरवर एका नेटकऱ्याने असा दावा केला आहे की, ऐश्वर्या रायने घटस्फोटाची पुष्टी केल्यानंतर अभिषेकव निम्रत लवकरच लग्न करु शकतात. ‘डर्टी बॉलीवूड गॉसिप’ नावाच्या हँडलवरुन रेडिटवरही असाच दावा पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन निम्रतसाठी ऐश्वर्या रायची कथित फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे.

जेव्हा पापाराझीने निम्रत कौरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला तेव्हा अशा अनेक कमेंट्स आल्या ज्यामध्ये नेटकरी अभिषेक व ऐश्वर्या यांच्यातील मतभेदाचे कारण म्हणून निम्रत कौरला दोष देताना दिसले. विरल भयानीने पोस्ट केलेल्या पोस्टवर एका यूजरने लिहिले आहे की, “तिचे व अभिषेकचे अफेअर आहे, हे खरे आहे का?”, तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “निम्रत व अभिषेक बच्चन यांचे अफेअर आहे. हे काय आहे?”. तर एका चाहत्याने असं म्हटलं आहे, “मिस वर्ल्डची फसवणूक? भाऊ, आता भरोसा उरला नाही”.
आणखी वाचा – ‘आहट’ हॉरर शो आता मराठीत, सोनी मराठीकडून घोषणा, २० वर्षांनी पुन्हा एकदा पसरणार भीतीचे सावट
अभिषेक बच्चन व निम्रत कौर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दसवी’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात निम्रत कौरने अभिषेक बच्चनच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवांना वेग आला होता. अभिषेक-ऐश्वर्याबाबत निम्रत कौरला ट्रोल करत असले तरी बच्चन कुटुंब व ऐश्वर्या राय यांच्याकडून या मुद्द्यावर काहीही बोलले गेले नाही.