मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधून जुईला लोकप्रियता मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून झळकत असून तिने या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारली आहे. जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. (Jui Gadkari Wedding Look)
अशातच जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. जुईने शेअर केलेला हा व्हिडीओ जुना आहे. पण तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये प्रतिमा सायलीच्या डोक्याला बाशिंग बांधत आहे. दोघीही या व्हिडीओमध्ये मजामस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा असून या व्हिडीओमधून दोघींमधील ऑफस्क्रीन बॉण्ड पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणने केदार शिंदेंची घेतली भेट, घरी बोलवत केला विशेष पाहुणचार, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
या व्हिडीओबरोबर जुईने असं म्हटलं आहे की, “उतावीळ आई be like! सगळ्यांचं म्हणणं हेच! की बाई लवकर लग्न कर आणि हीच इच्छा मी व्यक्त करत आहे”. तसंच हा व्हिडीओ जुना असल्याचेही जुईने सांगितले आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “छान व्हिडिओ”, “व्वा ताई तुझी स्माईल खुप छान आहे”, “जुई ताई ज्या घरची सुन होईल त्या घरचे सोने होईल”, “शुभ मुहूर्तावर, शुभमंगल लवकरच”, “तुम्ही ज्या घरी जाणार, ते घर सुखाने भरभरून जाणार” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी जुईच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ मालिकेत सोज्वळ व साध्या सुनेची भूमिका साकारून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. आता सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.